झेंडे, भित्तीपत्रके
लावण्यास निर्बंध
सिंधुदुर्गनगरी ः विधानसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे याकरिता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती यावर संबंधित मालकाच्या व संबंधित परवाना प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वापर करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहितान्वये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (ता. २५ नोव्हेंबर) निर्बंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.
.............
अनधिकृत बॅनर्ससह
जाहिरातींना प्रतिबंध
सिंधुदुर्गनगरी ः विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही व्यक्ती/संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विरुपित करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीमध्ये होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. परवानगी संपल्यानंतर ते दूर करून इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तत्काळ काढून घेणे आवश्यक आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितान्वये निवडणुकीच्या कालावधीमध्ये शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विरुपित करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रतिबंध लावण्यात आले असल्याचे जिल्हा दंडाधिकारी अनिल पाटील यांनी म्हटले आहे.
...............
सार्वजनिक ठिकाणांवर
होर्डिंग्ज, बॅनर्सना मनाई
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई पोलिस अधिनियमान्वये निवडणुकीच्या प्रचाराचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल, अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लावण्यात आले असल्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी अनिल पाटील यांनी दिले आहेत.
...............
शासकीय कार्यालय आवारात
आंदोलन, उपोषणांवर निर्बंध
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहितान्वये जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्याच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध लावण्यात आले असल्याचे जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील यांनी आदेशित केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.