कोकण

विरोध करणारे कार्यकर्ते म्हणजे भाजपं नव्हे

CD

विरोध करणारे कार्यकर्ते हे भाजपं नव्हे

योगेश कदम ः खेड-दापोलीत महायुतीमध्ये आलबेल
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २२ : भाजपचा तळागाळातील कार्यकर्ता हा महायुतीला मानणारा आहे. दापोली, मंडणगड येथील भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्या आहेत. आमच्या बैठकाही झाल्यात. त्यांनी सांगितले की ज्या दिवशी तिकीट जाहीर होईल, त्या दिवशी महायुतीचा उघडपणे प्रचार करु. त्यामुळे जे काही ठराविक कार्यकर्ते विरोध करत आहेत, ते म्हणजे भाजपं नव्हे, असा पुनरुच्चार करीत आमदार योगेश कदम यांनी महायुतीमध्ये आलबेल असल्याचे जाहीरपणे सांगितले.
खेड येथे पत्रकारांशी बोलताना कदम यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. कोकणात शिवसेना-भाजप महायुतीतमध्ये अंतर्गत वाद समोर आले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी आमदार योगेश कदम यांना केलेला विरोध तसेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा या सगळ्याचा शिंदे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, महाविकास आघाडीचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून जर का जयंत पाटील यांना जाहीर करणार असतील तर मग आता उद्धव ठाकरे यांची कीव येते. २०१९ साली महायुतीचे सरकार येणार होते. पण मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी उद्धवजींनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आणि ते काँग्रेसची साथ घेऊन मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले, अशी खिल्लीही योगेश यांनी उडवली.
दरम्यान, उमेदवारी अर्ज केव्हा दाखल करणार यावर त्यांनी माझी उमेदवारी अजून जाहीर झालेली नाही, पण उमेदवारी मिळेल हे मात्र नक्की आहे. त्यानंतर अर्ज भरण्याची तारीख जाहीर केली जाईल.
------
चौकट
...तर मित्रपक्ष नि:श्वास सोडतील

महाविकाआघाडी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव जाहीर करत नाहीत. मात्र उद्धव ठाकरे हटून बसले आहेत, की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. आज खऱ्या अर्थाने शरद पवार यांचे राजकारण उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, असा टोला आमदार योगेश कदम यांनी लगावला.
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer News : तुकाराम मुंढे यांची बदली होणार?, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ विधानसभेत दिली माहिती

Mumbai Crime: कुर्ल्यात धक्कादायक घटना! कोयत्याचा धाक दाखवत १० वर्षांच्या मुलासमोर विवाहितेवर अत्याचार, आरोपीला अटक

Latest Marathi News Live Update : येत्या दोन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता; 'आयएमडी’चा इशारा

Venezuela Earthquake: काही मिनिटांत दोन महाभूकंप; इमारतींचे ढिगारे, १० हजार जणांचा मृत्यू झाल्याची भीती... क्षणात उद्ध्वस्त झालं शहर

Tukaram Mundhe: हॉटेलात मोफत अन् स्वच्छ पिण्याचं पाणी बंधनकारक, सुरक्षित अन्नासाठी कठोर नियम; तडजोड नाही, तुकाराम मुंढेंचा इशारा

SCROLL FOR NEXT