कोकण

उद्योग साकारताना बुद्धी आवश्यक का बळ0

CD

उद्योग साकारताना ......लोगो

पैशांची निर्मिती मानवी श्रमातून होते तशी ती बुद्धीच्या अचूक वापरातूनही होते. उद्योग हा हुशारीने करायचा धंदा असून, ती बळजबरीची रोजंदारी किंवा नोकरी नव्हे हे उद्योजकाने लक्षात घ्यायला हवे. पैसा मिळतोय किंवा भविष्यात जरा आणखी चांगला पैसा मिळेल, या आशेने बुद्धीचा उपयोग न करता कोणतीही विशेष रणनीती न आखता फक्त शारीरिक बळाचा वापर करून स्वयंरोजगार करत राहणे किंवा कालांतराने उद्योजकीय प्रेरणा संपवून टाकत वेठबिगारी पत्करत उद्योजकीय पटलावरचे एखादे प्यादे बनून कार्यरत राहणे, हे उद्योजकीय पुरूषार्थाचे खरे लक्षण निश्चितच नव्हे.
P२४N२०४९९
- प्रसाद जोग
theworldneedit@gmail.com
-------

उद्योग साकारताना बुद्धी आवश्यक का बळ?

‘बुद्धिबळातील’ प्याद्यालाही बुद्धीच्या जोरावर स्वतःला राजाच्या इतकाच सन्मान प्राप्त करून घेता येतो व आपला आत्मसन्मान वाढवता येतो ही गोष्ट बुद्धिबळ या खेळातून उद्योजकांनी नक्कीच शिकण्यासारखी आहे. बुद्धिबळामध्ये जसे प्रत्येक प्याद्याचे स्थान महत्वाचे असते तसेच उद्योजकतेत जर दीर्घकाळ टिकून राहायचे असेल तर बुद्धी आणि बळ यांचा योग्य व संतुलित वापर करण्याचे कसब उद्योजकाला शिकून घ्यावेच लागते. उद्योग साकारताना किंवा एखादा हंगामी व्यवसाय उभारताना ‘उद्योजकाला नक्की आवश्यक काय?’ असा प्रश्न बऱ्याच वेळेला नवउद्योजकांकडून विचारला जातो. याचे उत्तर बुद्धीचे बळ व बळ वापरण्याची योग्य बुद्धी असे देता येईल. हंगामी व्यवसाय (सीझनल बिझनेस) करताना सुद्धा योग्य नियोजन नसेल, स्पष्टता नसेल किंवा प्रतिस्पर्ध्यांच्या गर्दीत उद्योजक म्हणून स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवायची नैसर्गिक समज नसेल तर सगळे प्रयत्न, कष्ट उद्योजकीय शहाणपणा न दाखवता आल्याने व्यर्थ ठरू शकतात. हे कसे होते ते उदाहरणांसह समजून घेण्याचा प्रयत्न करू...
सध्या दिवाळी सणासाठी बाजारपेठा सजू लागल्या आहेत. प्रत्येक नवउद्योजकाला खात्री असते की, या दिवाळीत चांगला धंदा करता येईल. दिवाळीचे पदार्थ ग्राहकांकडून जास्त प्रमाणात विकत घेतले जातील. दिवाळी म्हटलं की, ग्राहकांना घरगुती खाद्यपदार्थ लागणार. त्यासाठी आपल्याकडे विविध श्रेणीतील मुबलक पदार्थ तयार असायलाच हवेत, असा एकांगी विचार करून नव्या उत्साहाचे ‘हंगामी व्यवसाय करण्यास इच्छुक उद्योजक’ फक्त उत्पादकता या एकाच अंगाने विचार करून या उद्योजकता खेळात ‘बाजारपेठेचा’ कल न बघता, वस्तुस्थिती लक्षात न घेता फक्त कुटुंबातील सदस्यांची सर्व ‘ताकद’ लावून फराळ बनवायचा उद्योग सुरू करतात. त्यासाठी छोटी कर्जही घेतली जातात. जवळच्या दुकानदारांची उधारी ठेवली जाते किंवा कोणत्या तरी मोठ्या ठेकेदाराच्या आमिषाला बळी पडून उत्पादनक्षमता नसतानाही दिवाळीचे पदार्थ बनवण्याचा घाट घालून घरच्या मंडळींना उगाचच त्यांचे स्वारस्य नसताना किंवा त्यांची संमती नसताना बळे बळे वापरले जाते; पण अशा प्रकारच्या घाईगडबडीत केलेल्या उद्योगाला म्हणावे तसे यश येत नाही. कारण, पूर्वीसारखे फक्त फराळ या एकाच गोष्टीवर वारेमाप खर्च करणारे ग्राहक राहिलेत कुठे?
(वरील केस स्टडीमध्ये उद्योजकीय ‘अपरिपक्वपणा’ व संतुलित बुद्धीचा अभाव दिसून येतो. कारण, वस्तुस्थिती अशी असते... की दिवाळीच्या फराळामध्ये जशी उत्पादकता आवश्यक असते त्याहूनही जास्त गुणात्मकता, गुणवत्ता व प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत पदार्थांच्या किंमती कमी ठेवून ग्राहकांना आकर्षित करण्याची आवश्यकता, ग्राहकांशी जोडलेले संबंध व ग्राहकांना आपलेपण वाटेल असे स्नेहसंबंध प्रस्थापित करण्याचीही जास्त गरज असते.)

- बुद्धी आणि बळाचा योग्य वापराने यश मिळवता येते ते पाहूया.
* हंगामी व्यवसाय करताना संभाव्य बाजारपेठ खरोखर उपलब्ध आहे का, याचा अंदाज घ्यावा.
* हंगामी व्यवसाय करताना उत्पादन करण्यापेक्षा विक्री व मालाचे वितरण कसे वेगवान करता येईल हे पाहावे.
* उद्योगचक्र कमी कालावधीचे असल्याने जास्तीची जोखीम घेऊ नये.
* उगाचच उत्पादन श्रेणी वाढवण्यापेक्षा हंगामी व्यवसायातही जे चांगले बनवू शकतो ते बनवून त्याचीच विक्री करा.

बुद्धी ः बुद्धी म्हणजे अशी निसर्गदत्त क्षमता जी व्यक्तीला काय चांगले व काय वाईट हे ठरवण्यास उपयुक्त ठरते. उद्योजकीय बुद्ध्यांक जर चांगला असेल तर उद्योजकतेत उद्योजकाला यश संपादित करता येते. बुद्धिबळाच्या खेळाप्रमाणे उद्योजकाने आधी आपला स्थायी स्वभाव तपासून घेऊन उद्योग यशस्वी होण्यासाठी काय काय करावे लागेल म्हणजे प्रतिस्पर्ध्यावर मात करून त्याला शह देता येईल, याचा विचार करायला हवा. यालाच बुद्धिबळाच्या पटावर चाल म्हणतात तर उद्योजकीय परिभाषेत त्याला रणनीती, असेही आपण म्हणू शकतो.
बुद्धी ही नियोजन प्रक्रियेत किंवा धोरण ठरवताना अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडते. बौद्धिक क्षमता उद्योजकांमध्ये विकसित झाल्या असतील तर उद्योजक प्रसंगानुरूप उद्योजकीय चाली बदलून आगेकूच करू शकतात. बुद्धिबळामध्ये जसे प्रत्येक सोंगटीला (प्याद्याला) जिवंत ठेवण्यासाठी, स्वतःचे स्थान अबाधित ठेवण्यासाठी ''विचारांचे बळ" लावावे लागते तसेच उद्योजक म्हणून उद्योजकाला अशा बुद्धीची गरज असते जी उद्योजकाला स्वतःमध्ये योग्य बदल घडवून आणण्यास व आजूबाजूच्या परिस्थितीनुसार उद्योजकीय लवचिकता आणण्याची क्षमता देईल.
कोणताही व्यवसाय हा उद्योजकाला बाजारपेठेतील गरजांची पूर्तता करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी योग्य बळही लावावे लागते. वस्तूची किंवा सेवेची मागणी नक्की कशी आहे० बाजापेठेत येणाऱ्या ग्राहकांचा नक्की कल काय आहे० याचा विचार न करताच फक्त एकांगीपणाने उत्पादन घेत बसणारे उद्योजक कोणत्याही हंगामी व्यवसायात यशस्वी होतातच असे नाही. बळ म्हणजे ताकद नव्हे तर योग्य परिणाम येतील अशा योग्य गोष्टींकडे विशेष लक्ष देणे किंवा आपली ऊर्जा योग्य गोष्टीवर केंद्रित करणे होय.

- बुद्धिबळ उद्योजकाला काय शिकवते?
* कोणाचे कोणावाचून अडत नाही; पण एखादे प्यादेही नडू शकते.
* प्रतिस्पर्ध्यांच्या प्रत्येक चालीवर आपले बारीक लक्ष ठेवून स्वतःला सज्ज ठेवणे.
* बुद्धिबळात आत्मिक बळावर आपला स्वभाव धर्म न बदलता कोणाशीही स्पर्धा करता येऊ शकते, हे समजून येते.
* पटावर जसे चित्र दिसते तसे प्रत्यक्षात असतेच असे नाही.
* उद्योगात किंवा खेळात नुसत्या बळाचा वापर करून चालत नाही तर विविध प्रकारचे ‘डावपेच’ आखत, रणनीती अवलंबत यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायला लागतात.
* ‘बुद्धिवान’ ही जर वेळेत चाल करू शकला नाही तर स्वतःचे नुकसान करून घेऊ शकतो.
* स्थिर बुद्धीने हरत आलेलाही डाव जिंकता येतो.
* घाईघाईने नियम बाजूला ठेवून चाल करून जाता येत नाही.
* प्रत्येकवेळी आक्रमण करून यश मिळत नाही तर कधी कधी खंबीर नेतृत्व असूनसुद्धा बचावात्मक पवित्रा घ्यायला लागतो.
* बुद्धिबळ संयम शिकवते .
* बुद्धिबळ खेळण्यासाठी एकाग्रता महत्वाची असते तशी उद्योजकीय पटलावर वावरतानासुद्धा सजगता महत्वाची ठरते.

(लेखक उद्योगप्रेरणा प्रशिक्षक आहेत.)
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT