लोगो ः मत-गंमत
--
गोगल गाय नी पोटात पाय!
घरातील सर्व कामे आटोपून आजी आणि नातू घराच्या उंबरठ्यावर बसून चर्चा करत होत्या. तसे आजीचे कुटुंब हे राजकारणीच असल्यामुळे तिला प्रत्येक माणसाचा स्वभाव चाचपण्याची सवय होती. नातू मात्र शांत, सुस्वभावी; पण भित्रा जसा नारायणराव पेशव्यांसारखा; पण घराण्याची बाजू भक्कम करण्यासाठी आजीचा तसा अट्टाहासच. राजकारणात त्याला रस नाही; पण आजीबरोबर त्याचे सख्य असायचं. आजी सांगेल तसा तो वागायचा. नुकतेच गावात एका पक्षाचा उमेदवार गाव देवळात नारळ ठेवण्यास आला होता. आजीने नातवाला तुही त्यांच्या बरोबर जा. त्याबरोबर नातूही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सामिल झाला. गावाच्या मंदिरात सर्व मंडळी जमली. गुरवाने भावी आमदाराचे स्वागत केले आणि कार्यकर्त्यांना व देवाला उद्देशून थोडक्यात भाषणाला सुरवात झाली. नातू हे सर्व बघत होता. तेव्हा त्यातील एकाने आजीच्या नातवाला भाषणासाठी उभे केले. नातू रवींद्र म्हणाला की, मी नवमतदार आहे. गाव आणि देशाचा विकास ही माझी संकल्पना ती सत्यात उतरली पाहिजे. ही हकीगत आजीला कळली. नातू राजकीय बोलू शकतो, या स्वभाव पडताळणीवर तिचा पडदा पडला गोगल गाय नी पोटात पाय..आजीने नातवाचे भरभरून कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.