‘अॅनालिटिकल केमिस्ट्री’त
मुंबई उपकेंद्राचे यश
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाच्या एमएससी केमिस्ट्री विषयाचा निकाल जाहीर झाला. यात चरित्रकार पद्मभूषण डॉ. धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसर मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. अॅनालिटिकल विभागामध्ये साक्षी झगडे प्रथम (९.२७ सीजीपीए), अनिकेत गुरव द्वितीय (९.२५), शुभम नाईक तृतीय (९.०६) यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले. अॅनालिटिकल विभागाचा निकाल ९४.७३ टक्के लागला. उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, उपकुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.