कोकण

आरोही, तन्मयी यांची राज्यस्पर्धसाठी निवड

CD

आरोही, तन्मयी यांची
राज्यस्पर्धसाठी निवड
सावर्डेः डेरवण (ता. चिपळूण) येथील विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट अॅकॅडमीच्या आरोही पालखडे व तन्मयी जाधव या खेळाडूंनी आंतरशालेय विभागीय जलतरण स्पर्धेत शानदार कामगिरी नोंदवत राज्यस्पर्धेसाठी निवड निश्चित केली. सातारा येथील विभागीय क्रीडासंकुलात ही स्पर्धा झाली. स्पर्धेत १७ वर्ष वयोगटामध्ये आरोहीने ४०० व २०० मीटर फ्री स्टाईल क्रीडाप्रकारात प्रथम क्रमांक व १०० मीटर बटरफ्लाय प्रकारमध्ये द्वितीय क्रमांक तर तन्मयीने २०० मीटर वैयक्तीक प्रकारामध्ये प्रथम क्रमांक व ५० मीटर बटरफ्लाय क्रीडाप्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धा पुणे येथे होणार आहे.
------------
संगमेश्वर नाक्यावर
वाहनांची तपासणी
संगमेश्वर ः निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर पोलिस दक्ष झाले असून, संगमेश्वर नाक्यामध्ये विविध वाहनांची तपासणी केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वर हा नाका महत्वाचा असून, संगमेश्वर-कोल्हापूर तसेच महामार्गावरून जाणाऱ्या गाड्या या ठिकाणी थांबतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संगमेश्वर पोलिसांनी वाहनांची तपासणी करण्यास सुरवात केली आहे. संगमेश्वर पोलिसांनी संगमेश्वर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली.
----------
बौद्धजन शाखेच्या
अध्यक्षपदी जाधव
राजापूर ः राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई ग्रामीण शाखा राजापूर गट- 8 ची त्रैवार्षिक निवडणूक राजापूर बुद्धविहार येथे झाली. या वेळी महादेव गोठणकर, निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई ग्रामीण शाखा राजापूर गट-8 च्या अध्यक्षपदी कोदवली येथील विलास जाधव यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी उदय जाधव (शीळ), नरेश पवार (शिवणे), सरचिटणीस- सतीश जाधव (राजापूर), सहचिटणीस- सत्यजित जाधव (पन्हळे), प्रवीण पवार (दोनिवडे), खजिनदार- दिलीप पवार (कोंढेतड), संघ प्रतिनिधी- महादेव गोठणकर यांची निवड झाली आहे.
-------
लांजा आगारातून
पुण्यासाठी एसटी
लांजाः लांजा आगारातून २५ ऑक्टोबरपासून लांजा ते पुणे स्वारगेट ही बस सुरू करण्यात येणार आहे. तालुक्यातील अनेक नागरिक पुणे, मुंबई या ठिकाणी नोकरीनिमित्त आहेत. पुणे येथे जाण्यासाठी लांजा येथून थेट एसटी उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेता आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी खास दिवाळी सणाच्या निमित्ताने लांजा-पुणे स्वारगेट ही बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही बस सुरू राहणार आहे. लांजा बसस्थानकातून सकाळी ९ वा. बस सुटणार असून, परतीसाठी रात्री साडेनऊ वाजता सुटणार आहे. या बसफेरीचे आरक्षण हे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT