कोकण

तालुक्यातील चौपदरीकरणाचे काम रखडलेलेच

CD

संगमेश्वरमधील चौपदरीकरण रखडलेलेच

सुरक्षेची काळजी न घेतल्याने महामार्ग बनला धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते बावनदी अपघातप्रवण क्षेत्रातील चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना कोणतीही सुरक्षा घेतली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे तसेच या अपघातप्रवण क्षेत्रात वाहनांचे अपघातही घडत असून प्रवासी जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे.
अनेक ठिकाणी मोऱ्या आणि इतर बांधकामांचे काम रखडले आहे. धोकादायक ठिकाणी मोठे खड्डे काढून काम अर्धवट सोडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांचे मोठे अपघात घडत आहेत. चौपदरीकरणाचे काम करत असताना महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची सुरक्षा घेणे आवश्यक असते; मात्र ठेकेदार कंपनीकडून अशा कोणत्या प्रकारची यंत्रणा उभी केली जात नसल्याने महामार्ग धोकादायक बनला आहे. चौपदरीकरणाचे काम करत असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची देखरेख असणे आवश्यक असते; मात्र अशी देखरेख या ठिकाणी होत नसल्याने चौपदरीकरणाला कोणी वाली नसल्याचे चित्र संगमेश्वर तालुक्यात दिसून येत आहे. चौपदरीकरण करत असताना सुरवातीला अपघातग्रस्त रामपेठ वळण तसेच शासकीय विश्रामगृहासमोरील धोकादायक वळण हटवण्याची मागणी करण्यात येत होती; मात्र धोकादायक वळणे हटवली जात नसल्याने अपघात होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला नागरिक, काही वेळापूर्वीच म्हणाल्या होत्या, मॅनहोल उघडे ठेवल्यास कारवाई करू; VIDEO समोर

सोनम ते सिया व्हाया मुस्कान! प्रेमात आंधळं होत पतीला संपवलं, कुणी तुकडे केले, कुणी ड्रममध्ये भरलं, तर कुणी दरीत ढकललं...

Latest Marathi News Live Update : संत मुक्ताबाईंच्या मानाच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान

Pune Lonavala Railway: पुणे विभागाचा मोठा निर्णय! दररोज दोन लाख प्रवाशांना दिलासा; पुणे-लोणावळा मार्गावर मोठे रेल्वे काम सुरू

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT