‘६५ वर्षावरील नागरिकांना
एसटीत सवलत द्या’
पावस ः महाराष्ट्र शासनाने ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीने प्रवास मोफत केला आहे; मात्र या वयोगटातील प्रवाशांची संख्या कमी आहे. शारीरिक अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिकांना बसमध्ये चढणे, उतरणे कठीण जाते. तसेच त्यांना एसटीने प्रवास करण्यास कुटुंबही नकार देतात. त्यामुळे ६५ वर्षापासून वयोगटांतील ज्येष्ठ नागरिकांनाही मोफत प्रवासाचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे. आर्थिक अडचणीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करता येत नाही. या समस्येचा सारासार विचार करून शासनाने या वयोगटातील नागरिकांनाही मोफत प्रवास योजनेत सहभागी करून घ्यावे.
------
महायुतीत भाजपातर्फे
समन्वयकपदी अधटराव
साडवली ः भाजपचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रमोद अधटराव यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघाच्या निवडणूक भाजपकडून समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रमोद अधटराव यांना दिले आहे. अधटराव यांनी गेली सहा वर्षे संगमेश्वर तालुकाध्यक्षपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली. मित्रपक्षातील शिंदे सेनेचे विधानसभा समन्वयक म्हणून सदानंद चव्हाण, तर राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव या तिघांची महायुती समन्वयपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता या तिघांवर मोठी जबाबदारी आली आहे.
---
अवकाळीमुळे
नुकसानीची भरपाई द्या
रत्नागिरी ः जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने आणि त्यानंतर आलेल्या अवकाळी पावसाने भात शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतीचे पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्याकडे केली. रत्नागिरी तालुक्यासह लांजा, राजापूर, संगमेश्वर, चिपळूण आदी भागात भातशेती कापणीला आली असताना मोठया प्रमाणात पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे त्वरित पंचनामे करण्याची मागणी जिल्हाध्यक्षांनी केली. या वेळी जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, तालुका सरचिटणीस सुशांत पाटकर, शहर सरचिटणीस मंदार खंडकर, आयटी जिल्हा संयोजक नीलेश आखाडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.