कोकण

दहा लाखावरील व्यवहारांची माहिती द्या

CD

-rat२२p२७.jpg-
२४N२०५८७
राजापूर ः बँक आणि प्रिंटिंग प्रेसच्या व्यवस्थापकांशी संवाद साधताना डॉ. जॅस्मिन.
------------

दहा लाखांवरील व्यवहारांची माहिती द्या

डॉ. जॅस्मिन ः बॅंक, प्रिटिंग प्रेस व्यवस्थापकांची राजापुरात बैठक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २२ ः विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता अनुषंगाने राजापूर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. जॅस्मिन यांच्या अध्यक्षतेखाली बँक व्यवस्थापक व प्रिंटिंग प्रेसच्या व्यवस्थापकांची बैठक झाली. १० लाख रुपयांवरील व्यवहार आणि कॅशबाबत सविस्तर अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हर्षला राणे, तहसीलदार विकास गंबरे, प्रियांका ढोले, राजापूर विधानसभा मतदार संघातील सर्व बँक व्यवस्थापक व प्रिंटिंग प्रेसचे व्यवस्थापक उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारांना स्वतंत्र नवीन बँकखाते उघडणे, उमेदवारांचे खाते क्रमांक व पासबुक, चेक लवकर देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना डॉ. जॅस्मिन यांनी दिल्या. १० लाखावरील व्यवहार व कॅशबाबत अहवाल त्वरित कार्यालयाकडे देण्याच्या सूचना दिल्या तसेच सायंकाळी ६ नंतर कॅशचे व्यवहार करण्यास सांगण्यात आले. प्रिटिंग प्रेसच्या व्यवस्थापकांना प्रत्येक निवडणुकीचे पत्रक, हॅण्डबिल, प्लेकार्ड किंवा पोस्टर जे कोणत्याही प्रक्रियेद्वारे छापलेले किंवा मल्टीग्राफ (हाताने कॉपी करणे वगळता) समोर प्रिंटिंग प्रेसचे नाव आणि पत्ता आणि प्रकाशकाचे नाव आणि पत्ता असणे आवश्यक असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT