कोकण

‘महाविकास’ची ताकद विरोधकांना दाखवू

CD

20635

‘महाविकास’ची ताकद विरोधकांना दाखवू

हरी खोबरेकर ः आमदार नाईक उद्या अर्ज भरणार

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ ः लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची परतफेड करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयाची हॅट्रीक करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक हे सज्ज आहेत. गुरुवारी (ता.२४) त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना आणि महाविकास आघाडीची ताकद विरोधकांना दिसून येईल, असा दावा आज ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
येथील शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार ओरसकर, पूनम चव्हाण, राजू मेस्त्री, महेंद्र म्हाडगुत, सिद्धेश मांजरेकर, उमेश मांजरेकर, संतोष परब, मोहन मराळ, स्वप्नील आचरेकर, उमेश चव्हाण, रवि तळाशिलकर, सुहास वालावलकर, सिद्धार्थ जाधव, निना मुंबरकर, निनाक्षी शिंदे, अक्षय रेवंडकर, भगवान लुडबे, नितीन वाळके, किशोर गावकर, प्रसाद चव्हाण, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, शिवसेनेचे, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि आमदारप्रेमी उपस्थित राहणार आहेत. जाहीर सभा झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आमदार नाईक यांना आपला आशीर्वाद दिला आहे. शिवसेनेतून गद्दारांचा गट बाहेर पडल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिक आणि आमदार नाईक हे पक्षाशी एकनिष्ठ राहिले आहेत. यामुळे निष्ठेचा पाईक म्हणजे आमदार वैभव नाईक अशी त्यांची ओळख आहे. यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक त्यांच्या विजयासाठी सज्ज आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आमदारांच्या पाठिशी आपली ताकद उभी केली असल्याने याही निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणार आहोत, असा विश्वास श्री. खोबरेकर यांनी व्यक्त केला आहे.
श्री. नाईक हे सलग चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सलग त्यांनी नारायण राणे, रणजीत देसाई यांचा पराभव करत आमदारकीची दोन टर्म पूर्ण केली आहे. आता चौथ्यांदा ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना करण्यात येणारे शक्तीप्रदर्शन पाहून विरोधकांना धडकी भरणार असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update: एक दिवस हजेरी लावून विश्रांती... पुण्यातील पाऊस कुठं हरवला, राज्यात काय परिस्थिती?

हौस ऑफ बांबू : खादाड पत्रकारांचे मेन्यूकार्ड..!

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

SCROLL FOR NEXT