कोकण

खेडमध्ये नवीन पोलिस वसाहत उभी राहणार

CD

rat22p30.jpg-
20634
खेडः येथे जुनी वसाहत पाडण्यास सुरवात झाली आहे.
------------

खेडमध्ये नवीन पोलिस वसाहत उभी राहणार
जुनी वसाहत पाडण्यास सुरवात; ४२ कोटीचा खर्च
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २२ : जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र झटणाऱ्या येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या नवीन वसाहतीसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या नवीन पोलिस कर्मचारी वसाहतीच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे जुनी पोलिस कर्मचारी वसाहत जमिनदोस्त होणार असून, तोडकामाचे काम हाती घेण्यात आले आहे.
ब्रिटिशकालीन पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत अखेरची घटकाच मोजत होती. २० खोल्यांची ही वसाहत पडझडीच्या उंबरठ्यावर होती. यामुळे वसाहतीत एकही पोलिस कर्मचारी वास्तव्यास नव्हता. त्यामुळे नवीन पोलिस कर्मचारी वसाहत उभारण्यासाठी ४२ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. या निधीतून ५२ अद्ययावत खोल्यांची उभारणी करण्यात येणार आहे. पोलिस निरीक्षकांसाठीही स्वतंत्र निवासस्थान उभारण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत पोलिस कर्मचारी वसाहतीतील खोल्यांचे छत काढण्यात आले आहे. लवकरच एका बाजूकडील वसाहत जमिनदोस्त करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूकडील इमारती पाडल्यानंतर नवीन इमारत उभारणीचे काम सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुंबईसह उत्तर कोकणातील काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT