- rat२२p२०.jpg-
P२४N२०५४५
रत्नागिरी ः मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करताना रत्नागिरीतील प्रमुख पदाधिकारी.
---------
रत्नागिरीची उमेदवारी शिवसैनिकालाच द्या
उद्धव ठाकरे यांना साकडे ; दोन दिवसात घोषणेची ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ : शिवसेना पक्षातील इच्छुक असलेल्यांपैकी कोणा एकाला उमेदवारी द्या, अशी आग्रही मागणी रत्नागिरीतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहीती शिवसेना (ठाकरे गट) तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी पत्रकारांना दिली. मात्र पक्ष जो उमेदवार देईल, त्याचे काम करु, असा विश्वासही दिला. याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसात उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडेच राहणार आहे. मात्र अजूनही या जागेवरील उमेदवार निश्चित झालेला नाही. त्यासाठी जोरदार खलबते सुरू आहेत. सुरुवातीला येथून चार इच्छुक होते. त्यापैकी दोघांनी माघार घेतली असून सध्या उदय बने आणि राजेंद्र महाडीक यांची नावे आहेत. परंतु गेले काही दिवस भाजपचे माजी आमदार बाळ माने हे ठाकरे शिवसेनेत प्रवेश करुन त्यांना रत्नागिरीतून उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चा रंगु लागल्या आहेत. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. त्यानंतर आज शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी सहसंपर्कप्रमख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, संजय पुनसकर, तोडणकर आदी उपस्थित होते. या भेटविषयी पत्रकारांना माहिती देताना साळवी म्हणाले, आम्ही पक्षप्रमुखांची भेट घेतली आहे. रत्नागिरीतील उमेदवार कोण असावा याबाबत चर्चाही झाली. इच्छुक उमेदवारांपैकी एका निष्ठावंताला उमेदवारी द्यावी अशी भूमिका सर्वांतर्फे मांडली आहे. पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारीही आमची आहे, असा विश्वास दिला.
----
मानेंच्या प्रवेशाला मिळणार बगल?
ठाकरे सेनेकडून निष्ठावंताला उमेदवारी द्या, अशी मागणी केल्यामुळे भाजपमधून ठाकरे शिवसेनेत जाण्याची जोरदार चर्चा असलेल्या बाळ मानेंच्या ठाकरे शिवसेनेतील प्रवेशाला बगल मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. माने यांनी सध्या टोकाची भूमिका घेतली असून गरज वाटल्यास वेगळा निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले आहे.
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.