कोकण

जीआय नोंदणी करणारे १ हजार ८३९ आंबा बागायतदार

CD

‘जीआय’ नोंदणीधारक १ हजार ८३९ बागायतदार

पाच जिल्ह्यातील स्थिती ; हापूस आंब्याचा राज्यात पहिला क्रमांक, तीन वर्षापूर्वी मानांकन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः कोकण हापूस नावाने अन्य आंब्यांची होणारी विक्री रोखण्यासाठी कोकण हापूसच्या नावावर ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी कोकण हापूसला भौगोलिक निर्देशांक (जीआय मानांकन) देण्यात आले आहे. ‘हापूस’च्या नावावर होणाऱ्या विक्रीला बागायतदारांकडून विरोध होत आहे; मात्र ही नोंदणी करण्यासाठी जीआय देणाऱ्या संस्थांना बागायतदारांचे मेळावे घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत पाच जिल्ह्यातील १ हजार ८३९ बागायतदारांनी जीआय नोंदणी केली असून, राज्यात पहिला क्रमांक आहे.
रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील हापूसला ३ वर्षांपूर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. देवगडचा हापूस आंबा ‘देवगड हापूस’ तर रत्नागिरीचा हापूस ‘रत्नागिरी हापूस’ नावाने ओळखला जात आहे. रत्नागिरी व देवगड हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळाल्याने या आंब्याच्या नावाखाली कर्नाटक हापूस आंबा विकता येणार नाही; मात्र, त्यासाठी बागायतदारांना जीआय मानांकनासाठी अधिकृत नोंदणी करणे गरजेचे आहे. ही नोंदणी केल्यानंतर बागायतदारांना जीआय टॅग लावून आंबा विक्रीसाठी पाठवता येतो. फळासोबत लावलेला बारकोड स्कॅन केल्यानंतर मोबाइलमध्ये फळाचे उत्पादक व प्रक्रिया उद्योगाची माहिती मिळणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ६५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून, जिल्ह्यात २० हजार बागायतदार आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ हजार २५० हेक्टर क्षेत्र असून, ३४ हजार ४५० बागायतदार आहेत; मात्र, जीआय नोंदणीसाठी अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे. कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादन विक्रेते सहकारी संस्था, केळशी परिसर आंबा उत्पादक संघ, देवगड आंबा उत्पादक संघ हे जीआय मानांकन नोंदणीसाठी बागायतदारांकडे पाठपुरावा करत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ९०० बागायतदार, १४० प्रक्रिया व्यावसायिक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ७९९ बागायतदारांनी नोंदणी केली आहे.
.....
आवश्यक कागदपत्रे

‘जीआय’ मानांकनासाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, सातबारा याशिवाय २६०० शुल्क भरावे लागते. या शुल्कामध्ये दहा वर्षे नियंत्रण ठेवणे, आंब्याचा दर्जा पाहणे ही जबाबदारी संस्थेकडे सुपुर्द करण्यात आली आहे. नोंदणीनंतरच नोंदणीकृत व्यक्तींना हापूसचा टॅग किंवा बारकोड वापरता येतो.

-------
कोट

जास्तीत जास्त आंबा बागायदारांनी नोंदणी घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्हानिहाय मेळाव्यांचे आयोजन केलेले आहे. यंदाही लवकरच मेळावे घेण्यात येणार आहेत. मानांकन घेण्यात हापूस राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

- मुकुंद जोशी, सचिव, कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT