निष्ठा अन् गद्दार ठरवणारी निवडणूक
भास्कर जाधव ः पावसमध्ये आघाडीची प्रचारसभा
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येकाने राष्ट्रीय व नैतिक कर्तव्य पार पाडून मतदान केले पाहिजे. ही निवडणूक निष्ठा व गद्दार कोण हे ठरवणारी आहे. प्रत्येक वेळी पराभूत होऊन पक्षाचे चिन्ह व निष्ठा खाली न ठेवता अखंडितपणे पक्षाचे काम केले जात असताना माने यांना गद्दार ठरवले जात आहे. त्यामुळे ठाकरे शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्यांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे, असे प्रतिपादन ठाकरे शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले.
पावस येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, किरण तोडणकर, सुभाष पावसकर, मंगेश साळवी आदी उपस्थित होते.
आमदार जाधव म्हणाले, भाजपचे रवींद्र चव्हाण हे माने यांना गद्दार म्हणत आहेत. हे कोणाला पटेल का? कारण, ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांनाच आज निष्ठावंत म्हणून संबोधले जात आहे. गेली तीस वर्षे माने यांनी अनेक अडचणींचा सामना करत पक्षाचे काम अविरतपणे केले. अखेर बदल घडवण्याच्यादृष्टीने त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. या मागचा उद्देश कोणालाही समजला नाही. तुम्ही सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहा. महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने म्हणाले, या मतदार संघात गद्दारविरुद्ध इमानदार असा सामना होणार आहे. परिवर्तन घडवून आणण्याची वेळ आली आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.