कोकण

कोकणचा सुंदर निसर्ग मुलांनी शब्दबद्ध करावा

CD

- rat१४p५.jpg -
२४N२५०६२
संगमेश्वर : धनंजय शेट्ये यांनी कलादालनात घनश्याम पाटील आणि महादेव कोरे यांना कलाकृती भेट देत सन्मानित करण्यात आले.

कोकणचा सुंदर निसर्ग मुलांनी शब्दबद्ध करावा

घनश्याम पाटील ः ‘पैसाफंड’मध्ये साहित्यिक संवाद कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः कोकणच्या निसर्गाची भुरळ केवळ पर्यटकांनाच पडते असे नव्हे तर कवी आणि लेखक यांनाही पडत असते. कवी आणि लेखक यांनी कोकणचा हा नितांत सुंदर निसर्ग शब्दबद्ध करून जगभर पोहचवला आहे. विद्यार्थ्यांनीदेखील दैनंदिन वाचन करून काहीतरी लिहिलं पाहिजे. या सुंदर निसर्गावर लिहायला सुरवात केल्यानंतर शब्ददेखील कमी पडतील, असे प्रतिपादन संपादक घनश्याम पाटील यांनी केले.
व्यापारी पैसाफंड संस्था संगमेश्वर संचलित पैसाफंड इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ''विद्यार्थ्यांजवळ साहित्यिक संवाद'' या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी व्यासपिठावर संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये, कवी महादेव कोरे, प्रशालेचे मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक खामकर यांनी चपराक प्रकाशन संस्था आणि घनश्याम पाटील यांची ओळख करून दिली. व्यापारी पैसाफंड संस्थेतर्फे सचिव धनंजय शेट्ये यांनी पाटील यांचा सत्कार केला.
या वेळी पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे आणि गुरूजनांचे ऋण कधीही विसरू नयेत. शिक्षणात आता नवनवीन बदल होत आहेत. या बदलाचा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी उपयोग करून घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले. कवी महादेव कोरे यांनी या वेळी काही कविता सादर करून विद्यार्थ्यांशी हितगुज केले. पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sack Weight Limit: महाराष्ट्रात मोठा निर्णय! बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त गोण्यांवर बंदी; माथाडी कामगारांना दिलासा

Iran-Israel War: मोदींचा मास्टरस्ट्रोक! होर्मुजला शोधला पर्याय, आता तेलासाठी थेट पाईपलाईनच टाकणार; 'ब्लूप्रिंट' रेडी

११ महिन्यांच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू, मीच जबाबदार; चिठ्ठी लिहून WFH करणाऱ्या इंजिनिअर आईनं स्वत:ला संपवलं

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

Pune News : शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकतकराची अट रद्द

SCROLL FOR NEXT