गुहागर नगरपंचायत पुनरावृत्ती करणार
ःसंतोष सांगळे ः बेंडलांच्या रूपाने कुणबी समाजाला संधी
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १७ : गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीवेळी गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेने आपली ताकद दाखवली होती.
आमदार भास्कर जाधव यांनी नेहमीच समाजाला कमी लेखण्याचे काम केले. त्याचे परिणाम त्यांना तेव्हा दिसले होते. त्याची पुनरावृत्ती या विधानसभेतही होईल, असे संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष सांगळे यांनी सांगितले.
बुधवारी (ता. १३) कीर्तनवाडी भागडे विभागाच्या समाजमंदिरात झालेल्या गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेच्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, गुहागर असगोली कुणबी समाज संघटनेने गुहागर नगरपंचायतीवेळी आपली ताकद दाखवली होती. माजी पालकमंत्री व तत्कालीन आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांसमोर सक्षम आणि बळकट आव्हान आपण उभे केले. त्यासाठी समाज संघटनेने शहर विकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीला केवळ कुणबी समाजानेच नव्हे तर गुहागर शहरवासीयांनी पाठबळ दिले होते. त्यामुळेच गुहागर नगरपंचायत निवडणुकीत शहरविकास आघाडीने यश मिळवले. राजेश बेंडल यांना नगराध्यक्ष बनविण्यात आले. गुहागर नगरपंचायतीमधील एकूण जागांपैकी १७ जागांपैकी केवळ एका जागेवर जाधव समर्थक नगरसेवक निवडून आला. त्या वेळी आमदार जाधव यांच्याबद्दल असलेली नाराजी मतदारांनी दाखवून दिली. त्या निवडणुकीनंतर काही प्रमाणात या शहर विकास आघाडीत नाराजी नाट्यसुद्धा पाहायला मिळाले. आज महायुतीने बेंडल यांच्या रूपाने कुणबी समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. बेंडल हे गुहागर शहरातीलच आहेत. त्यामुळे जुनी नाराजीनाट्य विसरून सर्वांनी एकत्र यावे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.