- rat१५p१.jpg -
P२४N२५२९२
सावर्डे : क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आदी.
नेतृत्वगुण, समयसूचकतेची शिकवण खेळातून मिळते
राजेंद्र वारे ः सावर्डे विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवास सुरवात
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. १७ : खेळ शारीरिक व मानसिकतेने सशक्त बनवायला उपयुक्त आहेत. यश-अपयश कसे पचवावे हे खेळ आपल्याला शिकवतात. नेतृत्वगुण, समयसूचकता इत्यादी बाबींची शिकवण या खेळामधूनच मिळते, असे प्रतिपादन प्राचार्य राजेंद्र वारे यांनी व्यक्त केले.
येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून व क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन झाले. या प्रसंगी क्रीडाशिक्षक दादासाहेब पांढरे व अमृत कडगावे यांनी खेळाचे महत्व विद्यार्थ्यांसमोर विषद केले. क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. या महोत्सवात सांघिक स्पर्धेत कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल व ४ बाय १०० मीटर रिले या क्रीडाप्रकारांचा तर गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे, चारशे मीटर धावणे या वैयक्तीक क्रीडाप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. अशोक शितोळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.