कोकण

आचऱ्यात कार्तिकोत्सवाची दहीहंडी सोहळ्याने सांगता

CD

25697

आचऱ्यात कार्तिकोत्सवाची
दहीहंडी सोहळ्याने सांगता

सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १७ ः संस्थान आचरा गावच्या गेला महिनाभर सुरू असलेल्या कार्तिकोत्सवातील पालखी सोहळ्याची सांगता शुक्रवारी (ता. १५) रात्री दीपोत्सवाने झाली. पहाटे सुरू असलेल्या काकड आरतीची सांगता दहिहंडी फोडून करण्यात आली.
त्रिपुरारी पौर्णिमेची सायंकाळ संगीत अलंकार प्रा. केशवराव गाडेकर (पुणे) यांच्या गायनाने अविस्मरणीय ठरली. संस्थान आचरे गावचा सर्वांत मोठा उत्सव म्हणून कार्तिकोत्सव ओळखला जातो. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर हा उत्सव चालू असतो. यात रात्री पालखी सोहळा तर पहाटे विठ्ठल मंदिरात काकड आरती रंगते. कार्तिक दशमीला आचरा वरचीवाडी येथील नारायण मंदिराला व कार्तिक एकादशीला देवूळवाडी येथील विठ्ठल मंदिराला श्री विष्णू विराजित पालखीभेट दिली होती. यावेळी भाविकांची गर्दी उसळली होती. त्रिपुरारी पौर्णिमेला पावसाचे सावट असतानाही भाविकांचा उत्साह उल्लेखनीय होता. रात्री रामेश्वर मंदिर आणि दीपमाळा आकर्षक फुलांनी सजवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ठराविक वेळीच होणारे पंचमुखी महादेवाचे दर्शन त्रिपुरारी पौर्णिमेदिवशी होत असल्याने दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली होती. पहाटे विठ्ठल मंदिरातील काकड आरतीला प्रदक्षिणेनंतर पावल्यांचा फेर धरून दहिहंडी फोडून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी भाविकांची गर्दी उसळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajanta Caves Bee Attack : श्रीलंकेचे 100 पर्यटक लेणी न पाहताच पळाले! अजिंठ्यात पर्यटकांसोबत काय घडलं? 60 जण जखमी; 'या' एका चुकीमुळे ओढवली आफत

मॅनेरजने मोनालिसाला विकलं? 'हे लग्न नाहीतर लव्ह जिहाद...' दिग्दर्शकाचा धक्कादायक वक्तव्य

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT