25929
हरिनाम सप्ताहास मोर्वे येथे प्रारंभ
देवगड,ता.१७ : तालुक्यातील हिंदळे-मोर्वे येथील श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाज मोर्वे आयोजित श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवारपर्यंत (ता. २२) हा सप्ताह चालणार आहे. सप्ताहाचे यंदाचे ९९ वे वर्ष आहे. सात दिवस विविध भजनी मंडळांची भजने व भजनी दिंड्या यांचे सादरीकरण होणार आहे. पहाटे ५ वाजता काकड आरती, दुपारी १२ वाजता प्रसाद, आरती, रात्री ८ वाजता प्रदक्षिणा, आरती, दिंडी, भजन मेळ्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शनिवारी (ता. २३) सायंकाळी श्री विष्णू अवतारांचे सादरीकरण (दहीकाला) आणि मिरवणूक काढत घट विसर्जन सोहळा होईल, तर रविवारी (ता. २४) दुपारी १२ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता ग्रंथ वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री पांडुरंग प्रासादिक भजन मंडळ भंडारी समाजाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.