N25812
‘इंद्रधनुष्य’ महोत्सवात
सुधांशू सोमणचे यश
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १७ः पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे झालेल्या ‘इंद्रधनुष्य’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवात येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील विद्यार्थी सुधांशू सोमण याने संगीत या कला प्रकारात यश मिळविले. त्याचा बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला.
यामध्ये भारतीय समूह गायन-सुवर्णपदक, पाश्चिमात्य समूह गायन -सुवर्णपदक, फोक ऑर्केस्ट्रा-कांस्यपदक, शास्त्रीय संगीत-कांस्यपदक, नाट्यसंगीत-कांस्य अशी एकूण पाच पदके मिळविली. त्याच्या या यशाबद्दल त्याचे महाविद्यालयाच्यावतीने अभिनंदन करून राष्ट्रीय स्तरावर होणा पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.