२५८३९
नडगिवे घाटीत कंटेनर उलटला
चालक गंभीर जखमी ः नियंत्रण सुटल्याने घटना
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीक नडगिवे घाटीत एका अवघड वळणावर मासळी नेणारा कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गावरील नडगिवे घाटीतील अवघड वळणावर मासळीने पूर्ण भरलेला १८ चाकी मोठा कंटेनर (एमएच ४६ सीएल १३४१) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पलटी झाला. या वळणावरून सुमारे २०० मीटरपर्यंत कंटेनर फरफटत गेला. या अपघातात चालक शेशनाथ चव्हाण (वय ३५, रा. उत्तरप्रदेश) हा गंभीररित्या जखमी झाला. कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. या अपघाताबाबत नडगिवे गावचे पोलिसपाटील जितेंद्र मण्यार यांनी खारेपाटण पोलिस ठाण्याला माहिती दिली. अपघाताची माहिती मिळताच तातडीने खारेपाटण चेकपोस्टचे पोलिस अंमलदार चंद्रकांत माने यांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली. जखमी वाहनचालक शेशनाथ चव्हाण याला १०८ रुग्णवाहिकेने ओरोस जिल्हा रुग्णालय येथे उपचारांकरिता पाठविले. महामार्ग वाहतूक पोलिस एएसआय देसाई, देवेंद्र जाधव, संकेत चिंदरकर यांनी घटनास्थळी भेट दिली व अपघाताची पाहणी केली. अधिक तपास खारेपाटण पोलिस चेकपोस्टचे कर्मचारी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.