कोकण

रमेश भाटकर उत्सवी नाट्य स्पर्धेचे थाटात उदघाटन

CD

25766


रमेश भाटकर उत्सवी
नाट्य स्पर्धेचे उद्‍घाटन
रत्नागिरी, ता. १७ : तालुक्यातील गोळप येथील श्रीदेव हरिहरेश्वर देवस्थानच्या रंगमंचावर (कै.) रमेश भाटकर स्मृती उत्सवी स्पर्धेतील नाटकाचे पहिले पुष्प रंगतदार झाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद लाभला.
यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, सनातन रेडीज, संतोष सनगरे, सुधाकर बेहेरे, दादा कदम, विजय पोकळे, सचिन काळे, दीपक माणगावकर, आदी उपस्थित होते.
स्पर्धेचे उद्‍घाटन कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. नाट्य परिषदेच्या वतीने सौ. अनुया बाम यांनी नाटककार सौ. प्रज्ञा रायकर-जोशी यांचे नवे कोरे नाटक ''काहीतरी वेगळ'' उत्सवासाठी लिहिल्याबद्दल गुलाबपुष्प देऊन कौतुक केले. समीर इंदुलकर यांनी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल श्रीदेव हरिहरेश्वर नाट्यमंडळाला सहभागाचे मानचिन्ह सन्मानपूर्वक बहाल केले. उत्सव मंडळानेही श्री. इंदुलकर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. त्यानंतर नाट्यप्रयोग सादर झाला. विशेष म्हणजे या सर्व उत्सवी रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी येथील ज्येष्ठ रंगकर्मी भाग्येश खरे, गोपाळ जोशी, सचिन काळे, मनोहरपंत जोशी, प्रदीप तेंडुलकर, आदींनी उपस्थिती लावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गैस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

Latest Marathi Live Update :नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT