जेसीजची प्रतिमा अधिक उजळ करणार
नूतन अध्यक्ष दळवी ; पदग्रहण सोहळ्यात ग्वाही
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ : आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो, या भावनेतून जेसीजच्या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधीचे सोने करत प्रत्यक्ष कृतीतून सहकाऱ्यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवताना जनहितकारक उपक्रमाद्वारे साऱ्यांच्याच नजरेत भरणाऱ्या कामगिरीवर भर देणार असल्याची ग्वाही जेसीजचे नूतन अध्यक्ष अमर दळवी यांनी दिली.
खेड जेसीजच्या अध्यक्षपदी अमर दळवी, तर सेक्रेटरीपदी कपिल कोळेकर यांची निवड झाली आहे. भरणे येथील पाटणे लॉन येथे नूतन कार्यकारिणीचा शपथविधी झाला. ते म्हणाले, ‘सामाजिक बांधिलकीतून गरजूंना मदतीचा हात देण्यासह नावीन्यपूर्ण व विधायक उपक्रमांद्वारे जनसामान्यांमध्ये जेसीजची प्रतिमा अधिक उजळ करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.’ या वेळी नॅशनल हेअर ब्युटी अॅकॅडमीचे चेअरमन तुषार चव्हाण, जेसीजचे शाबा गौस, उपाध्यक्षा अर्चना राजन आदींसह जेसीजचे पदाधिकारी उपस्थित होते.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.