स्त्यावरचे खड्डे बुजले, धुळीने मात्र रडवले!
चिपळुणातील नागरिक ः व्यावसायिकांसह वाहनधारक त्रस्त
चिपळूण, ता. १७ ः येथील नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावरचे खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. त्या कामामुळे नागरिकांचा प्रवास सुखकर झाला असला तरीही धुळीने चांगलेच त्रस्त केले आहे. खड्डे भरण्यासाठी वापलेली बारीक खडी मोठ्याप्रमाणात रस्त्यावर तशीच आहे. त्या खडीची धूळ डोळ्यांमध्ये जाऊन त्रास होत आहे. व्यावसायिकांच्या दुकानातही धूळ शिरत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
चिपळूण नगरपालिका हद्दीतील बहुतांशी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत पावसाळ्यात दगड-माती टाकून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली होती. मात्र, उन्हामुळे या खड्ड्यांतील धुळीचा प्रचंड त्रास नागरिकांसह व्यावसायिकांना सोसावा लागत होता. काही दुकानदारांना तर दररोज धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी मारावे लागत होते. याबाबत ओरड होताच व पाऊस थांबताच पालिका बांधकाम विभागाने डांबरखडीने रस्त्यावरचे खड्डे भरले. खड्डे भरल्यानंतर धुळीच्या समस्येतून सुटका होईल, अशी अपेक्षा होती. खड्डे बुजविल्यानंतरही धुळीचा त्रास काही कमी झालेला नाही. खड्डे भरण्यासाठी वापरलेली बारीक खडी रस्त्यावर आली आहे. एखादे मोठे वाहन अथवा चारचाकी गाडी या खडीवरून गेल्यास मागून प्रचंड धूळ उडते. यामुळे नागरिकांसह वाहनधारक व व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. एवढेच नव्हे, तर या बारीक खडीवरून दुचाकी घसरण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे नगर पालिकेने ही बारीक खडी बाजूला करावी, अशी मागणी केली जात आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.