कोकण

कणकवलीत परिवर्तन अटळ

CD

लोगो ः कणकवली विधानसभा

25787

कणकवलीत परिवर्तन अटळ

संदेश पारकर ः खारेपाटण बाजारपेठत प्रचार रॅली

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १७ ः कणकवली-देवगड विधानसभा मतदारसंघात आता परिवर्तन अटळ असून येथील सुज्ञ जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी व्यक्त केला. उरलेले दिवस तुम्ही माझ्यासाठी द्या, येणारी ५ वर्षे मी तुमच्यासाठी देतो, अशी भावनिक साद त्यांनी यावेळी मतदार जनतेला घातली.
श्री. पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (ता.१६) आठवडा बाजार दिवशी खारेपाटण बाजारपेठेत प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये खारेपाटण विभागातील ठाकरे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांसह महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. खारेपाटण शिवसेना शाखा कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर खारेपाटण शिवसेना शाखा कार्यालय ते खारेपाटण एसटी बस स्थानक मार्गे खारेपाटण बाजारपेठ ते घोडेपाथर बंदरपर्यंत पारकर यांची प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी श्री. पारकर यांनी खारेपाटण बाजारपेठेतील नागरिक व व्यापारी वर्गाच्या भेटी घेतल्या. खारेपाटण एसटी बसस्थानक येथे उपस्थित प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशी वर्गांची सुध्दा त्यांनी भेट घेत संवाद साधला. विविध कामांची माहिती देत महाविकास आघाडीला निवडून देण्याचे भावनिक आवाहन केले.
खारेपाटण बाजारपेठ येथे महाविकास आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुधाकर कर्ले, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रवीण वरुणकर, शिवसेना कणकवली उपतालुका प्रमुख महेश कोळसुलकर, खारेपाटण विभाग संपर्क प्रमुख सतीश गुरव, युवा सेनेचे कार्यकर्ते तेजस राऊत, महिला विभाग प्रमुख सौ. अंजली पांचाळ, खारेपाटण विभाग प्रमुख बाळा राऊत, खारेपाटण युवा सेना विभाग प्रमुख निखिल गुरव, शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर वळंजू, संतोष पराडकर, सुधीर गांधी, शंकर राऊत, रमेश गुरव तसेच ठाकरे शिवसेनेचे विलास करांगुटकर, खारेपाटण विभाग संघटक दया कुडतरकर, प्रकाश पाटणकर, सुनील कर्ले, वैभव कांबळे, गणेश सांगेलकर, भूषण कोळसुलकर, महिला शिवसेना कार्यकर्त्या मनस्वी कोळसुलकर, सरिता वारंगे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट ! पुढील ४८ तास धोक्याचे, २१ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Chhatrapati Sambhajinagar News: एमएचटी सीईटी २०२६ नोंदणीसाठी अखेरची संधी; १९-२० मार्चपर्यंत मुदतवाढ

Latest Marathi News Live Update : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक; राष्ट्रवादीकडून कोणाला संधी? राजकीय वर्तुळात उत्सुकता

Mahalakshmi Temple: भुईंजच्या महालक्ष्मी मंदिरात निसर्गाचा चमत्कार; सूर्यकिरणांच्‍या अभिषेकाने तेजाळली मूर्ती, काय आहे पाैराणिक महत्व!

US Israel Iran War : इराणकडून सुरक्षा प्रमुखाच्या मृत्यूची कबुली, अमेरिकेचा होर्मुझजवळील क्षेपणास्त्र तळावर सर्वात शक्तिशाली बॉम्बने हल्ला

SCROLL FOR NEXT