कोकण

दोन ट्रकच्या धडकेमध्ये कारिवडेत तिघे जखमी

CD

25876

दोन ट्रकच्या धडकेमध्ये
कारिवडेत तिघे जखमी

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः कारिवडे-उभागुंडा येथे दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात आयशर ट्रकमधील दर्शन रवींद्र फोंडेकर व शिवाजी विठ्ठल बेडगे (दोघे रा. कोल्हापूर) हे दोघे गंभीर जखमी झाले, तर अन्य एक किरकोळ जखमी झाला. या अपघातात मोठी हानी झाली नसल्याची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी दिली.
कारीवडे-उभागुंडा रस्त्यावर कोल्हापूरच्या दिशेने जाणारा सहाचाकी ट्रक व आयशर कँटर यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात शनिवारी (ता. १६) सायंकाळी झाला. धडकेनंतर कँटरमधील दर्शन फोंडेकर व शिवाजी बेडगे हे दोघे बाहेर फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले. सहाचाकी ट्रकचा चालक इब्राहिम बालीगर (रा. कर्नाटक) हा जखमी झाला. जखमींना ग्रामस्थांनी मदतकार्य करून रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉ. प्रशांत जडे व डॉ. अपेक्षा कुबल यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. यात एका चालकाच्या नाकाला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. इतर जखमींची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आपल्या गावी पाठविण्यात आले. डॉ. प्रवीण देसाई यांनी योग्य ती तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात सहभाग घेतला. अपघातातील जखमींना जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष मसूरकर यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra School: महाराष्ट्रातील सर्वच शाळांमध्ये मराठी अनिवार्य! न शिकवल्यास मान्यता रद्द होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Gas Shortage: जेजेतील कॅन्टीन सेवेला गॅसटंचाईचा फटका; विद्यार्थी, डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाइकांना त्रास

सिलिंडरसाठी रांगेत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका, ६६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबियांकडून आर्थिक मदतीची मागणी...

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

Latest Marathi News Live Update : नगर-श्रीगोंदा मार्गांवर तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात

SCROLL FOR NEXT