कोकण

गणपतीपुळेतील श्रींचे मंदिर दिव्यांनी सजले

CD

25891
25892

गणपतीपुळेतील श्रींचे मंदिर दिव्यांनी सजले
कोजागिरी ते कार्तिक पौर्णिमादरम्यान दीपोत्सव; ग्रामस्थांसह पर्यटकांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव करण्यात आला. यावेळी गावातील स्थानिक ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावली होती. तर या कार्यक्रमात अनेक भक्तगण आणि पर्यटक सहभागी झाले होते.
आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेपासून ते कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या काळात हा उत्सव मनोभावे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात साजरा करण्यात आला. कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा चालणारा हा दिव्यांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात दररोज साजरा करताना करताना संस्थान श्री देव गणपतीपुळेची संपूर्ण पंचमंडळी, मुख्य पुजारी, देवस्थानचे सर्व कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. यावेळी स्वयंभू गणपती मंदिरात स्थानिकांच्या व भक्तगणांच्या उपस्थितीत रितीरिवाजानुसार दररोज सायंकाळी श्रींची पंचोपचार पूजा करून सात वाजता मंदिरातील सर्व विद्युतपुरवठा व रोषणाई खंडित करून फक्त तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण मंदिर प्रकाशित करण्यात आले. आरती मंत्रपुष्पांजली सेवा सादर करण्यात आली. याप्रसंगी दिव्यांचा मनोहारी झगमगाट आणि लखलखाट अनुभवता आला. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्या दिवसाच्या दीपोत्सवाची सांगता करण्यात आली.
दीपोत्सवानिमित्त संपूर्ण श्रींचे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजविण्यात आले होते. मंदिर परिसरात करण्यात आलेली दिव्यांची आरास खास आकर्षण ठरली. याप्रसंगी दीपोत्सव सांगताप्रसंगी अवकाशात करण्यात आलेली आकर्षक फटाक्यांची आतषबाजी सर्वांसाठी विशेष लक्षवेधी ठरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दहावीचे गणिताचे पेपर फुटले, टेलिग्राम ग्रुपच्या Adminवर गुन्हा दाखल

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT