ट्रकमध्ये झोपलेल्या
चालकाचा मृत्यू
रत्नागिरीः शहरातील साळवी स्टॉप येथे ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचा आकस्मिक मृत्यू झाला. शहर पोलिसात मृत्यूची नोंद केली आहे. महम्मद शफिक हौसिलदार खान (वय ७०, रा. सम्राट अशोक नगर, चेंबुर, सध्या. रा. साळवी स्टॉप, रत्नागिरी) असे मृत चालकाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १४) सकाळी साडेसातच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार महम्मद खान हे खबर देणार यांच्या कंन्स्ट्रक्शन ऑफिसच्या गाडीवर कामाला होते. १० नोव्हेंबरला चालक म्हणून ते कामाला आले होते. बुधवारी (ता. १३) नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजता ट्रकमध्ये एका हॉटेलच्या समोर गाडी लावून झोपले होते. गुरुवारी खबर देणार हे त्यांना फोन करत होते. मात्र फोन उचलला नसल्याने ट्रक उभा असलेल्या ठिकाणी गेले तेव्हा ते झोपलेल्या स्थितीत आढळले. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला पण ते शुद्धीत येत नसल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना तपासून मृत घोषित केले.
-------
सार्वजनिक ठिकाणी
मद्य प्यायल्याने गुन्हा
रत्नागिरीः हातखंबा येथील सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. नीलेश जानू मायंगडे (वय ३६, रा. भोके, मायंगडेवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १५) सायंकाळी साडेचारच्या सुमारास हातखंबा येथील रस्त्यालगत निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करताना आढळला. -----
दुचाकीवरुन पडून
पती-पत्नी जखमी
रत्नागिरीः शहरानजीकच्या आदर्श वसाहत-कारवांचीवाडी येथे दुचाकी स्पीड ब्रेकरवरुन घसरून अपघात झाला. यामध्ये पती-पत्नी दोघे जखमी झाले. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. अमोल अनंत विश्वासराव (वय ३८) व आदिती अमोल विश्वासराव (३५) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास आदर्श वसाहत रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमोल विश्वासराव हे पत्नीसह दुचाकीवरुन जात असताना डंपरला बाजू देत असताना डंपरने स्पीड ब्रेकरला ब्रेक केला. मात्र बाजू देण्याच्या नादात स्पीड ब्रेकरवरुन अमोल दुचाकीवरुन पुढे जात असताना अपघात झाला. दोघेही दुचाकीवरुन पडून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.