25937
पुतळ्यावरुन विरोधकांकडून
राजकारण ः मंत्री केसरकर
ठाकरेंच्या टिकेवर प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल उद्धव ठाकरेंपेक्षा कणभर जास्त अभिमान आम्हाला आहे. महाराजांवर ते बोलले हे आक्षेपार्ह होते. पुतळा कोसळल्यावर चुक केलेल्यांना प्रायश्चित भोगावं लागलं. त्यांच्या चुकीचा दोष सरकारला देणं योग्य नाही. घडलेल्या घटनेचे आम्हालाही दुःख आहे. मात्र, विरोधक राजकारण करत आहेत, असा पलटवार महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी केला. राजकोट येथे छत्रपतींचा पुतळा देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकार साकारत आहे. राजकोट येथे ‘उर्जा हिंदुत्वाची’ व विजयदुर्ग येथे ‘मराठा आरमार संग्रहालय’ साकारणार आहे. आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळात या प्रस्तावाचे सादरीकरण केल्याची माहितीही त्यांनी दिली.
श्री. केसरकर यांनी आज आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत कन्या सोनाली केसरकर, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सुरज परब आदी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘‘राजकोट येथे आता होणारा शिवारायांचा पुतळा हा देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकार साकारत आहे. शिवसृष्टीची उभारणी येथे करण्यात येणार आहे. उर्जा हिंदुत्वाची ही संकल्पना तेथे साकार होणार आहे. या प्रस्तावाच सादरीकरण मंत्रिमंडळ बैठकीत केलं. जेटीचा आराखडा तयार केलाय. आचारसंहितेपूर्वी २० दिवस अगोदर मंत्रिमंडळात सादर केला आहे. एक अद्वितीय असा प्रकल्प तिथे साकारेल. छत्रपतींच्या नावीक दलाचे सरसेनापती कान्होजी आंग्रे यांच्या कामगिरीची आठवण म्हणून विजयदुर्गलाही मराठा आरमार संग्रहालय साकारले जाणार आहे. माझा राजकीय वारस घोषित करायला मला परंपरागत राजकीय वारसा नाही. मला सामाजिक वारसा होता. यापुढे माझ्या सामाजिक कार्याची वारसदार माझी मुलगी सोनाली केसरकर असेल. माझ्या सोबत संजू परब, सुरज परब आहेत. ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझा वारसदार तयार झाला पाहिजे, त्यामुळे इथे प्रत्येकाला संधी आहे.
..............................
25938
विकास करण्याची भाषा
केसरकरांना शोभत नाही
नम्रता कुबल ः वेंगुर्ले येथे प्रचार बैठका
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १६ ः येथील मतदारसंघाचा अजून विकास करायचा म्हणून संधी मागणाऱ्या दीपक केसरकरांनी पंधरा वर्षांत काय केले? आता विकास करण्याची भाषा केसरकरांना शोभत नाही. त्यांनी आपला विकास करण्यापलीकडे या मतदारसंघातल्या जनतेसाठी काही केले नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा मत देऊन चूक करू नका, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीवाच्या महिला प्रदेश सचिव नम्रता कुबल यांनी आज येथे केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांच्या प्रचारार्थ वेंगुर्ले शहरात बैठका घेण्यात आल्या. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगराध्यक्ष नम्रता कुबल, काँग्रेस तालुकाध्यक्ष विधाता सावंत, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश डिचोलकर, नम्रता कुबल, सावली पाटकर, दिक्षा पालव, दिव्या नार्वेकर, विवेक कुबल, सत्यवान साटेलकर, कृतिका कुबल, अजित राऊळ, रामेश्वरी गवंडी आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील गाडी अड्डा, कलानगर, दाभोसवाडा, महाजन वाडा, खांबड भटवाडी, राऊळवाडी आदी भागात बैठका घेण्यात आल्या. श्री. तेली यांनी याठिकाणी विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेऊनच विकास केला जाईल. याठिकाणी आरोग्याचा, मच्छिमारांचा, शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असे सांगितले.
----------------------
25939
मतदारसंघात व्यापाऱ्यांचे प्रश्न
सोडविण्यासाठी प्रयत्नशील
अर्चना घारे परब ः शिरोडा बाजारपेठेत प्रचार फेरी
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १७ ः व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्न करण्याचे असल्याचे अपक्ष उमेदवार सौ. अर्चना घारे परब यांनी सांगितले. शिरोडा बाजारपेठेत आज त्यांनी झंझावती अशी प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून घोषणांनी शिरोडा बाजारपेठ परिसर दणाणून सोडला.
सौ. घारे-परब यांनी थेट लोकांपर्यंत पोहोचून प्रचाराला गती दिली आहे. गावोगाव जावून त्या महिला, स्थानिक व व्यापाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज त्यांनी शिरोडा बाजारपेठेतील व्यापारी वर्गांच्या तसेच घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. यावेळी सर्व व्यापारी व जनतेचे मिळणारे आशीर्वाद हे घारे परब यांना प्रेरणा देणारे व उत्साह वाढविणारा अशा आशयाचे होते. यावेळी त्या समवेत वेंगुर्ले पदाधिकारी योगेश कुबल, दीपिका राणे, विक्रांत कांबळी, विशाल बागायतकर, अजित नातू, प्रवीण मेस्त्री, फैजान शेख, आदिती चुडजी, पूनम परब, वनिता मांजरेकर, हृतिक परब, मयूर कामत, विवेक गवस व अन्य पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.