जिल्ह्यात २,२७३ जणांना
गृहमतदान सुविधेचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १७ ः विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय यंत्रणेने नियोजन केले आहे. भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील व दिव्यांग मतदार, जे मतदान केंद्रापर्यंत जाऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी गृहमतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. जिल्ह्यात १५ ते १७ नोव्हेंबर दरम्यान गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये जिल्ह्यात २ हजार ३७० पैकी २ हजार २७३ मतदारांनी गृहमतदान केले. विधानसभा संघनिहाय गृहमतदारांची संख्या व एकूण मतदान पुढीलप्रमाणे ः कणकवली-१ हजार ११६ पैकी १ हजार ५५, (अपंग-१५८, ८५ वर्षांपुढील-८९७), कुडाळ-६३८ पैकी ६१२ (अपंग-६०, ८५ वर्षांपुढील-५५२), सावंतवाडी-६१६ पैकी ६०६ (अपंग-९१, ८५ वर्षांपुढील-५१५) मतदारांनी मतदान केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.