फोटो ओळी
KOP24N25984
राजापुरात माजी जि. प. सदस्य सुहास पाटील यांचे शिवसेनेत स्वागत करताना किरण सामंत यांसह महायुतीचे पदाधिकारी
प्रचारफेरीद्वारे किरण सामंतांनी
साधला मतदारांशी संपर्क
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 17 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे दोन दिवस उरले असतानाच राजापुरात महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी ठाकरे शिवसेनेला चांगलाच दणका दिला आहे. शिवसेनेचे देवाचे गोठणे विभागाचे माजी जि. प. सदस्य सुहास उर्फ भाई पाटील यांनी रविवारी किरण सामंत यांच्या पाठीशी राहून त्यांच्या विजयाचा निर्धार केला.
महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांना मतदार संघात वाढता पाठींबा मिळत आहे. रविवारी किरण सामंत यांच्या उपस्थितीत शहरात प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा प्रारंभ किरण सामंत यांनी जवाहर चौकातील शिवस्मारकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून केली. यावेळी सुहास पाटील यांचीही उपस्थिती होती. सामंत यांनी पाटील यांचे स्वागत केले. या प्रसंगी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. किरण सामंत यांनी या प्रचारफेरीत जवाहर चौक परिसरात काही नागरिकांशी संवाद साधत विजयी करण्याचे आवाहन केले. त्यानंतर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जवाहर चौक व पुढे शहर बाजारपेठ अशी प्रचार रॅली काढली व किरण सामंत यांच्या वचननाम्याचे वाटप करून त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.