कोकण

नागवे येथे अजगराला जीवदान

CD

26216

नागवे येथे अजगराला जीवदान
कणकवली, ता. १९ ः नागवे (ता. कणकवली) येथील मूर्तिकार शशिकांत सातवसे यांच्या गणेशमूर्ती शाळेनजीक रविवारी (ता. १७) सायंकाळी आढळलेल्या भल्यामोठ्या अजगरास गावातील सर्पमित्र यश वर्दम, औदुंबर पाटील यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
मूर्तिकार शशिकांत सातवसे यांच्या गणेशमूर्ती शाळेनजीक साफसफाईचे काम सुरू होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आठ फुटांचा भलामोठा अजगर सागर वर्दम यांना आढळला. यावेळी गावातीलच सर्पमित्र यश वर्दम, औदुंबर पाटील यांना पाचारण करण्यात आले. सर्पमित्र येईपर्यंत काळोख पडल्याने अजगारास पकडण्यास अडचणी येत होत्या. मात्र, त्यांनी अजगरास मोठ्या शिताफीने पकडून येथील नैसर्गिक अधिवासात सोडले. यावेळी अजगरास पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. सर्पमित्रांचे उपस्थितांमधून कौतुक होत आहे. ‘‘साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो उंदीर व किटकांपासून पिकांचे संरक्षण करतो, मात्र ग्रामीण भागांत सापांबाबत अनेक गैरसमज असल्यामुळे साप दिसताच त्यांना ठार मारले जाते. मात्र, तसे न करता त्यांना सर्पमित्रांच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडावे,’’ असे आवाहन सर्पमित्रांनी केले. यावेळी अशोक सातवसे, चंद्रकांत सावंत, अजय सावंत, सुरेंद्र दळवी, संतोष तेली, महेश मोरजकर, महादेव मोरजकर, विठोबा हुले, प्रसाद पाताडे, श्री. बागवे, प्रशांत गावकर, सूर्यकांत सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT