P24N26271
इलेव्हन फायटर्स एडीसंघ विजेता
मंगलमूर्ती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा; १६ संघांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः गेले आठवडाभर शहराजवळील कोळंबे येथील सोसा मैदानावर श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठान व छोटू देसाई क्रिकेट अॅकॅडमी यांच्यावतीने झालेल्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत इलेव्हन फायटर्स एडी संघाने मानाचा मंगलमूर्ती प्रतिष्ठान चषक पटकावला.
या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले होते. सोमवारी (ता. १८) या स्पर्धेतील अंतिम सामना चुरशीचा झाला. या चुरशीच्या लढतीत इलेव्हन फायटर्स एडी संघाने सदानंद प्रसाद संघावर ४६ धावांनी मात केली. अभिषेक जोशी याने झळकावलेले झंझावती शतक हे अंतिम सामन्याचे आकर्षण ठरले. इलेव्हन फायटर्स एडी आणि सदानंद प्रसाद या दोन संघात अंतिम सामना रंगला. इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सहा गड्यांच्या मोबदल्यात संघाने आव्हानात्मक अशा १९० धावा जमवल्या. अभिषेकने ६० चेंडूत झंझावती शतक झळकावले. त्याने १०९ धावा केल्या. यामध्ये सहा चौकार आणि दहा षट्कारांची आतषबाजी केली. इमरान मुकादम याने २७ चेंडूत ३७ धावा केल्या. पार्थ गांधीने ३ गडी बाद केले.
बलाढ्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सदानंद प्रसाद संघाला हे आव्हान पेलले नाही. ७ गडी गमावून केवळ १४४ धावातच करता आल्या. यश गांधीने २३ चेंडूत ४३ धावा केल्या. रिकी परदेशीने ४४ चेंडूत ४३ धावा केल्या. नितीश काळेने दोन गडी बाद केले तर अदनान शेखनेही दोन गडी बाद केले. शतकवीर अभिषेक जोशी याला सामनावीर किताबाने गौरवण्यात आले. साहिल मदार हा स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला तर अभिषेक सर्वोत्तम फलंदाज ठरला. सर्वोत्तम गोलंदाज म्हणून श्रेयस शिंदे तर क्षेत्ररक्षक म्हणून निखिल नाई याला गौरवण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.