शतकोटी वृक्ष लागवड कागदावरच
पावसाळ्यानंतर कार्यवाही ; रोपांचे संगोपन, देखभाल
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः जुलै महिन्यात राबवण्यात आलेल्या शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेतील रोपांची लागवड आता पावसाळा संपल्यानंतर कागदावरच राहिली आहेत. या मोहिमेंतर्गत लावण्यात आलेली झाडे जागेवर दिसून येत नसल्याचे पुढे आले आहे.
शतकोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गंत लाभार्थ्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावे रोपांचे संगोपन आणि देखभाल केली. वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा होणार ऱ्हास यामुळे सामाजिक वनीकरण विभागातर्फे लाखो रुपये खर्च करून झाडे लावा झाडे जगवा मोहीम राबवण्यात आली. पावसाळ्यात वृक्ष लागवडीकडे फारसे लक्ष देण्याची गरज नव्हती; मात्र आता पाऊस गायब झाल्यानंतर लागवड केलेली ही रोपे जागेवरच नाहीत. याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ही मोहीम केवळ कागदावर राबवली जात आहे. मोहिमेंतर्गत झाडे लावण्यातही येत नाहीत किंवा ती जगवली जात नाहीत. झाडांना, रोपांना पाणी घालणे, कुंपण करणे, मातीचा थर करणे यासारखी विविध कामे दाखवून लाखो रुपयांचा खर्च दाखवला जात आहे. ही योजना राबवण्यासाठी ग्रामस्थांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावाने रोपांचे संगोपन व देखभाल करत असल्याचे भासवण्यात आले आहे; मात्र प्रत्यक्षात ज्यांच्या नावे ही कामे नोंदवलेली आहेत ती माणसेही जागेवर नाहीत. स्थानिक कर्मचारी व गावातील नेते यांच्या संगनमताने ही लागवड प्रत्यक्षात करण्यात आली नसल्याचे आता या मोहिमेतील प्रत्यक्षात लागवड न झालेल्या रोपांच्या मुळाशी बरेच पाणी मुरत असल्याची प्रतिक्रिया वृक्षप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.