कोकण

कोकणवासीयांपुढे वणव्यांचे आव्हान

CD

कोकणवासीयांपुढे वणव्यांचे आव्हान

मोठ्या प्रमाणात नुकसान ; नियंत्रणासाठी वनविभागाकडून कार्यवाहीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ ः कोकणातील ग्रामीण आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात वणवे लागत आहेत. वनविभागासह प्रशासनाने वणवे लागू नयेत यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. वणव्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकरी आणि बागायतदारांकडून होत आहे.
सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलेल्या पर्वतरांगांमध्ये कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी, रायगड आणि सिंधदुर्ग हे जिल्हे येतात. या भागात पाऊस ओसरल्यानंतर अनावश्यक रान काढण्याच्या नावाखाली वणवे लावण्याचे प्रकार घडत असतात. या डोंगराळ परिसरात असलेल्या गवतावर वणवे लावून डोंगर उजाड केले जातात. वणव्यामुळे परिसरातील अनेक झाडे प्रामुख्याने आंबा, कोकम, करवंदाच्या जाळ्या, जांभूळ अशी फळझाडे वणव्यात जळून नुकसान होते. काही शेतकऱ्यांनी फळ बागायती वृक्ष लागवड केली आहे. वणव्यामुळे या बागायतींना फटका बसतो. बागायतदार शेतकऱ्‍यांचे यामुळे लाखों रुपयांचे नुकसान होते. बागायतीमधील आंबा, काजू, कोकम आदी फळझाडांच्या बागायती होरपळून जातात. त्यामुळे या बागायतदारांच्या अडचणी वाढतात.
गुरांना पावसाळी हंगामात चांगला चारा मिळावा याकरिता वणवे लावले जात असल्याचे सांगितले जाते. वणव्यामुळे कोकणची निसर्गसंपदा व फळ बागायतींची राख होत आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बागायतदार आणि शेतकरी करत आहेत.
---
‘वणवामुक्त गाव’चे नियोजन करणे गरजेचे

शासनाने वनविभागाच्या माध्यमातून ‘वणवामुक्त गाव’चे नियोजन केले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणचे सरपंच यांच्यावर वणवा न लागण्याबाबत जबाबदारी देण्यात आली आहे तसेच वणवामुक्त गाव योजनेसाठी काही संस्थांनीही पुढाकार घेतला आहे; मात्र शासनाचे हे नियोजन वणवा लावणाऱ्यांमुळे अयशस्वी ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT