कोकण

रत्नागिरी ः भात उत्पादन घटण्याची शक्यता

CD

भात उत्पादन घटण्याची शक्यता
परतीच्या पावसाचा फटका; नुकसानीची पाहाणी करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ः ऑक्टोबरमध्ये पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील शेतीपिकांचे नुकसान केले होते. भातकापणी अंतिम टप्प्यात आली आहे. कामाच्या ताणाने जिल्ह्यातील पंचनामे मनुष्य बळाअभावी रखडलेले आहेत. निदान प्राथमिक पाहणी तरी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे यंदा उत्पादन घटण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरसह नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरावड्यापर्यंत अवकाळी पावसाने जिल्ह्यात ठिय्या मांडला होता; मात्र, त्यामुळे भाताच्या कापण्या रखडल्या होत्या. या पावसाने अनेक भागात भातपिक आडवे झाले होते. काही भगात कापणी केलेले भात भिजले. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेण्यास सुरवात केली. त्यामुळे पावसाचा दिलासा मिळताच आता भातकापणी अंतिम टप्प्यात सुरू आहे.
निवडणुकीची धामधूम सुरू होण्याआधी कापणीच्या कामांचा उरक करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात अधिकारी वर्ग गुंतल्याने कृषीहानीची पाहणीही रखडली आहे. आता कापणी उरकल्यानंतर पंचनामेही करणे कठीण जाणार आहे. यंदा जिल्ह्यात ४३ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली आहे. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने भात उत्पादन चांगले राहील, अशी शक्यता होती; मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाला सुरवात झाली. त्यानंतरही अवकाळी पावसची सत्रे सुरू राहिली. त्यामुळे भातकापणीचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परतीच्या पावसात हळवे तर अवकाळीत निमगरवे भातशेतीला फटका बसला. यात शेतकर्‍यांचे उभे असलेले भातपिक आडवे झाले आहे. आताही शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहेत. काहींनी पंचनाम्याची वाट न पाहताच भात झोडणी केली आहे. त्यामुळे त्यांना भरपाई मिळणे अशक्य आहे.

कोट
परतीच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान होणार हे निश्चित आहे; मात्र त्याचे प्रमाण किती राहील, हे आताच सांगता येणार नाही; मात्र उशिरा लागवड झालेल्या भातशेतीला मोठा फटका बसलेला आहे.
- गुरू सावंत, शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यप्रदेशच्या तीन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात दिली १० वीची परीक्षा; केंद्र संचालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

SCROLL FOR NEXT