कोकण

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ‘अलर्ट’ मोडवर

CD

26267

सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी ‘अलर्ट’ मोडवर

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; मध्यरात्री थेट तपासणी नाक्याला भेट देत घेतला आढावा

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः विधानसभेच्या मतदान प्रक्रियेत कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील स्वतः मैदानात उतरले आहेत. सोमवारी (ता. १९) मध्यरात्रीनंतर पाटील यांनी अचानक विविध चेकपोस्टना भेटी देत यंत्रणा ‘अलर्ट’ आहे का, याची शहानिशा केली. जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी हे दोन मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या संवेदनशील आहेत. तसेच आचारसंहिता लागू झाल्यानंतर पाऊण महिन्यांत तब्बल अडीच कोटींची गोवा बनावटीची दारू जिल्ह्यात पकडली गेली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिलेल्या भेटींना अधिक महत्त्व आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (२०) मतदान प्रक्रिया होणार आहे. यासाठी जाहीर सभेची मुदत सोमवारी सायंकाळी समाप्त झाली. त्यानंतर ‘छुप्या’ प्रचाराला सुरुवात झाली आहे. जाहीर प्रचार थांबल्यानंतर राहिलेल्या ३६ तासांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, निवडणुकीसाठी सज्ज केलेली तपासणी यंत्रणा ढिली होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी पाटील रात्री ३ पर्यंत स्वतः ‘ऑन फील्ड’ कार्यरत होते. त्यांनी जिल्ह्यातील इन्सुली-बांदा येथील पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चेकपोस्ट, सातार्डा चेकपोस्ट, आरोंदा चेकपोस्ट, कुडाळ तिठा मठ चेकपोस्टला अचानक भेटी दिल्या आणि पथक करत असलेल्या कार्यवाहीची पाहणी केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात निवडणुका निर्भयपणे होण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख मार्ग, शहरातील एंट्री पॉईंट, आंतरराज्य सीमावर्ती भाग, जिल्हामार्गावर वाहनांची तपासणी करण्यासाठी स्थिर सर्वेक्षण पथके कार्यान्वित केली आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एंट्री पॉईंटवर वाहनांच्या तपासणीसाठी स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित केली आहेत. ही पथके व्यवस्थित कार्यरत आहेत का, याची खात्री करण्यासाठी इन्सुली-बांदा येथील पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचा चेकपोस्ट, सातार्डा चेकपोस्ट, आरोंदा चेकपोस्ट, कुडाळ तिठा मठ चेकपोस्टला येथे जिल्हाधिकारी पाटील यांनी भेटी दिल्या आणि पथक करत असलेल्या कार्यवाहीची पाहणी केली. यावेळी त्यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, विशेषत: सीमेलगत असणाऱ्या स्थिर सर्वेक्षण पथकाने वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश कार्यरत पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिले.
मतदान प्रक्रियेला काही तास शिल्लक आहेत. या कालावधीत दारू, पैशांची वाहतूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसाठी हा कालावधी अतिशय महत्त्वाचा असतो. डोळ्यांत तेल घालून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी स्थिर आणि फिरती अशी १८ पथके निवडणूक जाहीर झाल्यावर तत्काळ कार्यान्वित केली होती. त्यात आणखी तीन पथके वाढविली आहेत. त्यामुळे यंत्रणेच्या कचाट्यातून कोणीही सुटणार नाही, असा बंदोबस्त लावला आहे. यामुळेच गोव्यातून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर मोठा चाप लावण्यात जिल्ह्यातील यंत्रणेला यश आले आहे. तब्बल अडीच कोटींची दारू पकडली आहे. जिल्ह्याच्या यंत्रणेने कडक भूमिका घेतल्याने व ही दारू गोवा येथून येत असल्याचे स्पष्ट झाल्याने गोवा शासनाने आपल्या उत्पादन शुल्क विभागातील पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे, तरीही जिल्ह्याची यंत्रणा आणखी खबरदारी घेऊन काम करीत आहे. अन्य राज्यांतून येणाऱ्या मार्गावर कार्यरत पथके वाहनांची कसून तपासणी करीत आहेत. विशेषतः दारू आणि पैसे वाहतूक होते का, याची खात्री करीत आहेत. उद्या होणारी निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हाधिकारी पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्यासह सर्व यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर काम करीत आहे.
............
संवेदनशील मतदारसंघांवर लक्ष
आचारसंहिता लागू होताच पहिल्याच पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी पाटील यांनी कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या संवेदनशील असल्याचे जाहीर केले होते. जिल्ह्यातील तीन पैकी दोन मतदारसंघ आर्थिकदृष्ट्या संवेदनशील असल्याने यंत्रणा जास्तीची ‘अलर्ट’ राहिली आहे. त्यामुळे ही यंत्रणा जिल्ह्यात मतदानासाठी पैशांचा वापर होतो का, यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
...............
उमेदवारांच्या वाहनांचीही तपासणी
यंत्रणेकडून उमेदवारांच्या वाहनांचीही तपासणी करण्यात आली आहे. विशाल परब यांच्यासह अन्य उमेदवारांच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत सर्वजण दक्षता घेताना दिसत आहेत.
.............
कोट
निवडणूक कालावधीत अथवा मतदान प्रक्रिया सुरू असताना कोणताही अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिस यंत्रणेशी संपर्क साधावा. सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा मॅसेज आल्यास त्याची खात्री करा व नंतरच तो ‘फॉरवर्ड’ करा. निवडणूक प्रक्रियेला बाधा येईल, असा मेसेज फॉरवर्ड केल्यास आणि त्यातून काही घडल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. याशिवाय जिल्हास्तरावर एक पथक कार्यरत आहे. हे पथक सोशल मीडियावर ‘व्हायरल’ होणाऱ्या प्रत्येक मॅसेज, व्हिडिओवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
- सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran India Oil Supply : इराणकडून भारतात येणारा ‘होर्मुझ’ सामुद्रमार्ग बंद, फक्त ४५ दिवसांचा इंधनसाठा; केपलर संस्थेची माहिती

सेपरेशन एन्झायटी डिसऑर्डर शाळा, पालकांची जबाबदारी

आजचे राशिभविष्य - 04 मार्च 2026

मोठी बातमी! ‘एनए’ परवाना, नॉन-क्रीमिलेअर, जातीचा दाखला गावातच मिळणार; जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार गावात येणार; ‘या’ १६ सुविधा गावातच मिळणार

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

SCROLL FOR NEXT