कोकण

कडेकोट बंदोबस्तात ३१० यंत्रे रवाना

CD

26268
26269

कडेकोट बंदोबस्तात ३१० यंत्रे रवाना

सावंतवाडी मतदारसंघ ः १८०० कर्मचारी तैनात

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः विधानसभा निवडणुकीसाठी सावंतवाडी मतदारसंघात उद्या (ता. २०) होत असलेल्या मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. येथील जिमखाना मैदान येथून आज सकाळी ३१० मतदान केंद्रांवर मतदान यंत्रे कडेकोट बंदोबस्तात रवाना झाली. तब्बल १८०० कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेसाठी नेमल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हेमंत निकम यांनी दिली.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान होत आहे. संपूर्ण मतदारसंघांमध्ये ३१० केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया होणार आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चार कर्मचाऱ्यांकडून मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. याशिवाय त्याठिकाणी एक पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड यांची नेमणूकही केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अतिरिक्त लक्ष ठेवण्यासाठी ४० झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. दरम्यान, आज सकाळी येथील जिमखाना मैदानावरून प्रत्येक केंद्रावर मतदान यंत्रे घेऊन कर्मचारी रवाना झाले. यासाठी खास एसटी बसची सुविधा केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी निकम, तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मतदान यंत्रे रवाना करण्यात आली.
एकूणच, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये ‘हाय होल्टेज’ निवडणूक होत आहे. त्यामुळे या मतदारसंघावर पोलिस यंत्रणेचे बारीक लक्ष आहे. कुठल्याही मतदान केंद्रावर कोणत्याही प्रकारचा वादविवाद किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीमध्ये निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्यानंतर सर्व मतदार केंद्रावरील यंत्रे सावंतवाडी येथील स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहे. येथील तहसील कार्यालयामध्ये २३ ला सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी तहसील कार्यालयात वेगळी व्यवस्था केली आहे. अकरापर्यंत निकाल स्पष्ट होणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी निकम यांनी सांगितले.
............
निर्भीडपणे मतदान करा ः दराडे
महानिरीक्षक संजय दराडे यांनी भेट देत निवडणूक कार्यक्रमाच्या यंत्रणेची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, ‘‘नागरिकांनी शांततेत आणि निर्भीडपणे मतदान करावे. सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा दिल्या आहेत. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठीही यंत्रणा सज्ज आहे.’’ यावेळी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, शाहिद आफ्रिदीचा सूर बदलला; आता म्हणतो, भारतच दावेदार होता, संजू सॅमसन....

Latest Marathi News Live Update : सोलापुरात घरगुती गॅस ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करताना तांत्रिक अडचणी

Sambhajinagar Panchayat Samiti : छत्रपती संभाजीनगर पंचायत समिती सभापती निवडणुकीपूर्वी गोंधळ; ठाकरेंच्या गटाचे तीन सदस्य गायब

Woman Success Story: राेपवाटिकेच्‍या पश्चिम महाराष्ट्रात १३ शाखांद्वारे राेजगार; शारदा भाेसलेंची नावीन्यपूर्ण यशस्‍वी भरारी, राज्यभर बाेलबाला!

"आमच्यात फक्त मैत्री.." विशालसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर रुचिताचा खुलासा ! म्हणाली..

SCROLL FOR NEXT