कोकण

मंडणगड-वेळास किनाऱ्यावर कचरा, घाणीचे साम्राज्य

CD

N26239

वेळास किनाऱ्यावर कचरा, घाणीचे साम्राज्य
ऑलिव्ह रिडले आगमन लांबणीवर; स्वच्छता अभियान राबवणे आवश्यक
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १९ः निसर्गाच्यादृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन होणाऱ्या वेळास समुद्र किनाऱ्यावर कचरा व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सप्टेंबरमध्ये तालुक्यातील सर्व स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी एकत्रितपणे समुद्र किनारा स्वच्छतेची मोहीम राबवल्यानंतरही समुद्र किनाऱ्याची दूरवस्था झाली आहे.
सागरी कासव संवर्धन मोहिमेमुळे जगाच्या नकाशावर आलेल्या वेळास गावातील कासव महोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. या महोत्सवामुळे गावातील पर्यटन उद्योगास चालना मिळाली असून, स्थानिक तरुणांना गावपातळीवर रोजगारही मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये कासवे समुद्र किनारी अंडी सोडण्यासाठी येत असतात. त्यात समुद्र किनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरल्याने कासवे अंडी न घालण्याची शक्यता आहे. वेळास समुद्र किनाऱ्याचे स्वच्छतेचे पालकत्व येथील एका कंपनीने घेतले आहे, असे असतानाही वेळास समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक, बाटल्या व अन्य कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहेत. स्वच्छतामोहिमेत गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे वेळेवर विगतवारी न करण्यात आल्याने व यानंतरही कचरा होण्याचे सत्र सुरूच राहिल्याने यंत्रणांनी हाती घेतलेली मोहीम ही केवळ प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा उपक्रम आणि प्रसिद्धीचे माध्यम ठरल्याची चर्चाही या अनुषंगाने सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Panchayat Samiti: शिंदे किंगमेकर! भाजपचे सर्वाधिक सदस्य तरीही काँग्रेसचा उमेदवार विजयी; २१ वर्षांची तरुणी सभापती

Baliraja Mofat Veej Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती! बळीराजा मोफत वीज योजनेचे नियम स्पष्ट; देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या अटी

तुमच्याशिवाय पुढचं आयुष्य कसं जाईल... T20 WC जिंकल्यानंतर रिंकू सिंगची वडिलांसाठी भावूक पोस्ट

‘महाराष्ट्र-गोवा बार’साठी २४ मार्चला मतदान; १५५ उमेदवार, १.८० लाख मतदार, निवडणुकीत सोलापूरचे सात उमेदवार; मतदान कसे होते? वाचा...

Jafrabad Accident : टेंभुर्णी जाफराबाद रोडवर अपघात; पिता पुत्राचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT