-rat१९p१७.jpg-
२४N२६२५८
रत्नागिरी : बियाणी बालमंदिरात बैलगाडी सफरीप्रसंगी बालदोस्तांसह विनायक हातखंबकर, धनश्री मुसळे, प्रदीप गावखडकर आदी.
-----
बालदोस्तांची बैलगाडी सफर
बियाणी बालमंदिरचा उपक्रम; खेळांसह वाद्यांचाही घेतला आनंद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : भारत शिक्षण मंडळ संचलित बियाणी बालमंदिर भिडे आजी खेळघरमध्ये शाळेच्या पटांगणात मांडलेल्या विविध खेळांचा मुलांनी मुक्तपणे आनंद घेतला. ताशे, ढोलकी, पेटी, तबला, ढोल आदी वाद्येही मुलांनी वाजवली. कार्यक्रमाचे खास आकर्षण होते बैलगाडीची सफर.
प्रदीप गावखडकर यांनी बैलगाडी छान सजवून आणली होती. मुलांनी त्यातून फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. खेळघरातील मुलांनी फुलांचे मुखवटे लावले होते. मुलांच्या हातावर मेहेंदी काढण्यात आली. घाणेकर यांनी बालदिनानिमित्त सुंदर रांगोळी काढली. भारतमातेचा जयजयकार करण्यात आला. चाचा नेहरूंचाही जयजयकार करण्यात आला. घोषणा देत मुलांची प्रभातफेरी काढण्यात आली. शालेय समितीचे अध्यक्ष राजेंद्र कदम, प्रबंधक विनायक हातखंबकर उपस्थित होते. त्यांनी बालदिनानिमित्त सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे नियोजन धनश्री मुसळे यांनी केले. सर्व शिक्षिका सेविका तसेच पालक प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.