कोकण

-किनारपट्टी भागात गारठा वाढला

CD

-rat१९p२९.jpg-
२४N२६३०२
पावस ः आंबा कलमांना पालवी आल्याने थंडीसोबतच हंगामाची चाहूल लागली आहे.
---------

कोकण किनारपट्टी भागात गारठा वाढला

जोरदारे वारे ; आंबा, काजू हंगामाची चाहूल
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १९ ः गेले दोन दिवस किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारीपट्टी भागात गारठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेला पाऊस आणि मळभी वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातही पहाटे आणि रात्री गारठा जाणवू लागला आहे. त्यामुळे आंब्यासह काजू बागायतदारांनी हंगामाची जुळवाजुळव सुरू केली आहे.
दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यात सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे आंबा बागायतदार चिंतेत होते. त्यात थंडी न पडल्याने आंबा हंगाम लांबण्याचीही भीती होती; मात्र सोमवारपासून थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. सकाळी आणि रात्री हलका गारठा पडू लागला आहे.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आणि दिवाळीतही पाऊस पडत होता. कार्तिक पौर्णिमेलाही पाऊस पडल्याने थंडी गायब झाली होती. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही असह्य उकाडा होत होता. हे मळभी वातावरण निवळले असून, गारठा जाणवू लागला आहे. जिल्ह्यातील किमान तापमानात घट झाली आहे. सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात पहाटे २८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सकाळी ते अर्ध्या अंशाने वाढले होते. दुपारी मात्र तापमान ३० अंशांवर होते. देवदिवाळी जवळ आल्याने जोरदार वारे सुटल्याने गारठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinagar: गंगापूरजवळ कंटेनरची दुचाकीला भीषण धडक; शेंदूरवादा येथील तरुणाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

Maharashtra Weather Update : राज्यात उन्हाचा कहर ! 'या' जिल्ह्यात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद, अनेक भागांत उष्णतेची लाट

Pune lifestyle Diseases: जीवनशैलीच्या आजारांचा तरुणाईला ‘संसर्ग’; पुण्यातील ७५ हजार जणांना उच्च रक्तदाब, ४४ हजार मधुमेहाच्या विळख्यात!

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे दोन हप्ते एकत्र? महिलांना मिळू शकतात थेट ३००० रुपये, पण पैसे नेमके कधी येणार?

SCROLL FOR NEXT