26303
जायगडे गुरूजींच्या स्मृतिदिनी
४२ विद्यार्थ्यांचा गौरव
किरबेट शैक्षणिक संस्थेचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १९ः स्व. जायगडे गुरूजींचा स्मृतिदिन संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे साजरा करण्यात आला. जायगडे गुरूजींनी केलेले कार्य पुढे चालू राहावे यासाठी त्यांच्या पश्चात त्यांचे हितचिंतक, मित्रपरिवार यांनी या ट्रस्टची स्थापना केली. त्यांच्या स्मृतिदिनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश, दहावी, बारावी, पदवी तसेच विशेष प्रावीण्य मिळवलेल्या ४२ विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी सहा विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्यात आले.
वर्षभर अतिगंभीर आजारी असणाऱ्या सात गरजू व्यक्तींना पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली. दत्तक पालक योजनेंतर्गत परिसरातील नऊ विद्यार्थिनींना रोख रक्कम देण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाची कॅरमपटू देवडे गावची सुकन्या आकांक्षा कदम हिचा सन्मान करण्यात आला तसेच संस्थेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे व उल्लेखनीय कार्य करणारे रवींद्र जायगडे, कार्तिकेय लाहीम, राजाराम चिंचवलकर, सोनाली लाड यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला उद्योजक विष्णू रामाणे, रामकृष्ण कोळवणकर, नानासाहेब शेट्ये, न्यासाचे अध्यक्ष बापूसाहेब शेट्ये, हरिश्चंद्र गीते, भारत संचार निगमचे माजी सहाय्यक प्रबंधक गणपत लाहीम, पुनस हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय बाईंग आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त संस्थेला तीन पंखे भेट देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.