विद्यार्थ्यांनी अनुभवले तीन कर्तृत्ववान महिलांचे कार्य
मध्य प्रदेशात शिबिर ः युनायटेडच्या गुरुकुलचे विद्यार्थी
संगमेश्वर, ता. १९ ः मातृभूमी परिचय शिबिर या गुरुकुलच्या उपक्रमाच्या निमित्ताने परशुराम एज्युकेशन सोसायटी चिपळूण संचालित युनायटेड इंग्लिश स्कूलची गुरुकुल विभागातील नववी व दहावीचे ३१ विद्यार्थी-विद्यार्थिनी मध्यप्रदेश राज्यात या शिबिरासाठी गेले होते. यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे ३०० वे जन्मशताब्दी वर्ष असल्याच्या औचित्याने मध्यप्रदेश राज्यामध्ये शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.
उज्जैनमध्ये भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे शैक्षणिक स्थळ जंतरमंतर, सांदिपनी आश्रम व चौदा विद्या चौसष्ट कलांचे प्रदर्शन, महाकाल कॉरिडॉर महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन, तर इंदोरमध्ये खजराना गणपती मंदिर, कमला नेहरू प्राणी संग्रहालय, लालबाग पॅलेस, काच मंदिर आणि अहिल्याबाई होळकर यांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय अशी पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणे पाहून ५६ दुकानांमधून इंदोरी खाद्यसंस्कृतीचा आस्वाद मुलांनी घेतला. शिबिराच्या तिसऱ्या दिवशी युनायटेड प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या लोकसभेच्या माजी सभापती पद्मभूषण श्रीमती सुमित्राताई महाजन यांची स्नेहभेट घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. सुमित्राताईंच्या निवासस्थानी झालेली तास-दीड तासाची स्नेहभेट मुलांसाठी अतिशय संस्मरणीय झाली. पद्मभूषण पदक व नव्या-जुन्या संसद भवनाचे फोटो अल्बम मुलांना तेथे प्रत्यक्ष पाहता आले. शिबिराच्या चौथ्या दिवशी इंदोरमधून खांडवाच्या दिशेने जात असताना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेत मुलांनी भव्य तीर्थक्षेत्र भेटीचा अनुभव घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.