आरटीओ नाका-रेल्वे ब्रीज मार्ग
२३ ला सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद
रत्नागिरी, ता. १९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीच्या दिवशी वाहतूककोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी २३ नोव्हेंबरला सकाळी ६ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व वाहनांना कुवारबाव आरटीओ नाका ते रॉयल इनफिल्ड शोरूम (रेल्वेब्रीज) या रस्त्यावर येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे, असे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आज दिले.
मतमोजणीवेळी या मार्गावर वाहतूककोंडी होऊ नये यासाठी प्रशासनाने ही काळजी घेतलेली आहे. या मार्गाला पर्यायी मार्गही सुचविण्यात आले आहेत. त्यात कुवारबाव आरटीओ नाका-कांचन हॉटेल-रेल्वेब्रीज अलीकडे हॉटेल श्रद्धा या बोर्डाजवळून माऊली किराणा स्टोअर्स-क्लासिक ऑटो सर्व्हिस-सिद्धी फर्निचर-साक्षी फूड-महाराष्ट्र कृषी उद्योग विभाग कार्यालय-रॉयल इनफिल्ड शोरूम (रेल्वे ब्रीज) या पर्यायीमार्गे वाहतूक वळवण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी प्रक्रिया २३ ला सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत आंबडेकर भवन परिसरात होणार आहे. मतमोजणी परिसरात वाहनांची व नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असून, यावेळी पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अगर वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. वाहतुकीची कोंडी टाळण्याकरिता हे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.