कोकण

दैवज्ञ पब्लिक ट्रस्टमार्फत शैक्षणिक संस्थांना आवाहन

CD

26339

दैवज्ञ पब्लिक ट्रस्टमार्फत
शैक्षणिक संस्थांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १९ ः निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या शिक्षकांना मतदान करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, म्हणून मुंबई उपनगरातील ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट प्रयत्नशील आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शिक्षक चळवळीतील युवा नेते डॉ. विशाल कडणे यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ज्या शैक्षणिक संस्थेच्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे १०० टक्के मतदान होईल, अशा संस्थांचा आणि संस्थाप्रमुखांचा गौरव ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार असून, सर्व शैक्षणिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे.
ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था शिक्षकांसाठी सातत्याने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवित असते. यंदा मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून शैक्षणिक संस्थांना १०० टक्के कर्मचाऱ्यांनी मतदान करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने केले आहे. शंभर टक्के मतदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करावे, असे आवाहन संस्था प्रमुखांना ट्रस्टच्या माध्यमातून केले आहे. या गौरव कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ई-मेल आयडीवर आपले नाव आणि माहिती नोंदवावी किंवा संपर्क साधावा, असे आवाहन ईशान्य मुंबई दैवज्ञ पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने डॉ. कडणे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT