बनावट मतदानावर करडी नजर
निवडणूक विभाग सज्ज ; सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : जिल्ह्यामधील सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे. त्याचा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असणार आहे. या ठिकाणांहून सर्व केंद्रांवर चालणाऱ्या मतदानाचे निरीक्षण केले जाणार आहे. कोणतेही बनावट मतदान होणार नाही, याबाबत सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि सर्व केंद्राध्यक्ष अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
पोलिस विभागालादेखील त्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर कोणत्याची स्वरूपाचे बनावट मतदान अथवा तोतयेगिरी आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिस विभागाला आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये पाचही विधानसभा मतदार संघामध्ये निर्भय, शांततापूर्ण आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक होण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. १७ नोव्हेंबरला निवडणूक निरीक्षक (खर्च) यांनी जिल्हा प्रशासनाच्या निवडणूकविषयक कामाचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. या बैठकीमध्येदेखील निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यात शांततापूर्ण, निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आदेश दिले आहेत. निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. बनावट मतदान रोखण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. तसे झाल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.