कोकण

गुहागरमध्ये मतदान केंद्रावर विशेष सजावट

CD

२६३२३

गुहागरमध्ये मतदान केंद्रावर विशेष सजावट
३२२ मतदान केंद्रे सज्ज; पोलिस यंत्रणा सतर्क
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. १९ ः गुहागर विधानसभा मतदारसंघासाठी गुहागर, खेड व चिपळूण येथे होणाऱ्या ३२२ मतदान केंद्रांसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध ठिकाणी सखी मतदान केंद्र, दिव्यांगांसाठी विशेष सोयीसुविधा असलेल्या दिव्यांग मतदान केंद्र युवा व आदर्श मतदान केंद्र करून या मतदान केंद्रांवर विशेष सजावट करून मतदारांचे स्वागत करण्यात येणार आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण मतदान केंद्रे ३२२ आहेत. यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मतदान अधिकारी १४३६ , शिपाई ३२२, आशा सेविका ३२२, स्वयंसेवक ६४४. वाहन व्यवस्थेमध्ये बस ४३, मिनीबस १०, जीप ४, नियुक्त झोनल अधिकारी ५३ सर्व मतदान अधिकारी मतदान केंद्रासाठी रवाना झाले आहेत.
पोलिस बंदोबस्तबाबत गुहागर पोलिस निरीक्षक सचिन सावंत यांनी सांगितले की, केंद्रीय सुरक्षादलाचे ८१ जवान, तसेच बाहेरून आलेले २७० होमगार्ड व पोलिस, स्थानिक पोलिस ३६, स्थानिक होमगार्ड ४४ असे हे तब्बल ४३१ पोलिस कर्मचारी तैनात राहणार आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यालयातून दोन डीवायएसपी व एपीआय नियुक्त करण्यात आले आहेत. गुहागरमध्ये एकही सेन्सिटिव्ह झोन नसला तरी निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : शनिवारवाडा पुन्हा सात मजली करा; आमदार हेमंत रासने यांची मागणी

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : गॅससाठी नागरिकांच्या रांगाच रांगा

SCROLL FOR NEXT