कोकण

नेते गुंतले मतदानाच्या नियोजनात

CD

नेते गुंतले मतदानाच्या नियोजनात

कार्यकर्त्यांची वर्दळ ः प्रचार थंडावला, तरी छुप्या गाठीभेटी

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १९ ः विधानसभा निवडणुकीतील जाहीर प्रचार थंडावल्याने आता मतदानाच्या दृष्टीने नियोजन सुरू झाले आहे. यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यालयांत कार्यकर्त्यांची वर्दळ वाढल्याचे चित्र होते. आता शांतपणे मतदारांच्या गाठीभेठी घेण्यावर भर देण्यात येत असल्याचे दिसून येत होते. विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी कार्यकर्त्यांचे नियोजन करण्यात व्यस्त होते.
विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता. २०) मतदान होत आहे. तालुक्यासाठी प्रशासकीय मतदान यंत्रणा कणकवलीमधून कार्यरत राहणार आहे. तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतपेट्या पोहोचवणे, मतदान झाल्यानंतर पुन्हा मतपेट्या जमा करणे आदी कामे कणकवली येथूनच चालणार आहेत. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात सध्या शुकशुकाट असल्याचे दिसून येत आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा कणकवलीत हलवण्यात आल्याचे चित्र आहे. विविध राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार थंडावला आहे. भाजप महायुतीचे उमेदवार नीतेश राणे आणि ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्यामध्येच खरी लढत आहे. त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा झाल्या. तसेच उमेदवारांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी बैठकाही घेण्यात आल्या. ठाकरे शिवसेना, महाविकास आघाडी आणि भाजप महायुतीच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी प्रचार रॅलीही काढण्यात आल्या. काही उमेदवारांनी ध्वनिक्षेपावरून प्रचार केला. तसेच सोशल मीडियाचा वापर करून प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर होता. ठिकठिकाणी खळा बैठकाही झाल्या. पक्षांतराचे कार्यक्रमही झाले. तालुक्यातील एकूणच वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे. आता जाहीर प्रचार थंडावला असला, तरी मतदानाच्या दृष्टीने नियोजनासाठी प्रयत्न सुरू आहेत. तालुक्यातील बूथनिहाय अधिक मतदान आपल्या उमेदवाराकडे वळविण्यासाठी सर्वांचा प्रयत्न राहील. त्यादृष्टीने मतदारांच्या गाठीभेठी घेत मतदान करण्यासाठी आवाहन केले जाताना दिसत होते.
..................
हायटेक प्रचारावर कार्यकर्त्यांचा भर
यावेळी हायटेक प्रचारावर अधिक भर देण्यात आला. यासाठी सोशल मीडिया, तसेच मोबाईल संदेशाचा वापर करण्यात आला. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जलद संपर्क यंत्रणेचा वापर करण्यात आला. अधिक जाहीर सभा न घेता गावनिहाय मतदारांच्या गाठीभेठी घेऊन मतदारांना साद घालण्यात आल्याचे चित्र होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT