कोकण

13 लाख 39 हजार मतदार आज बजावणार मतदानाचा हक्क

CD

चला, लोकशाहीचा हक्क बजावूया
जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रे ः २४ हजार ५८९ नवमतदार करणार मतदान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या (ता. २०) मतदान होणार आहे. पाच विधानसभा मतदारसंघांत ३८ उमेदवार रिंगणात असून, जिल्ह्यात १ हजार ७४७ मतदान केंद्रे आहेत. त्यात १३ लाख ३९ हजार ६९७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात नवतरुणांसह वृद्ध मतदारांची संख्याही मोठी आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी अगदी ग्रामीण भागापर्यंत मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील २४ हजार ५८९ नवमतदार असून, ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ पर्यंत मतदानाचा हक्क मतदारांना बजावता येणार आहे. जिल्ह्यात १७४७ विधानसभा मतदान केंद्र असून, यातील शहरी भागात १८४, तर ग्रामीण भागात १ हजार ५६३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. विधानसभा संघानुसार दापोलीमध्ये २ लाख ९१ हजार २९७ मतदार आहेत. यात १ लाख ३९ हजार ८९५ पुरुष, तर १ लाख ५१ हजार ४०२ महिला मतदार आहेत. गुहागरमध्ये २ लाख ४२ हजार ७०४ एकूण मतदार आहेत. त्यात १ लाख १५ हजार ५११ पुरुष, तर १ लाख २७ हजार १९३ महिला मतदार आहेत. चिपळूण मतदारसंघात १ लाख ३४ हजार ८८३ पुरुष, तर १ लाख ४१ हजार १८३ महिला असे २ लाख ७६ हजार ६६ एकूण मतदार आहेत. रत्नागिरी मतदारसंघात १ लाख ४२ हजार ४८ पुरुष, तर १ लाख ४९ हजार १६२ महिला, असे २ लाख ९१ हजार २२१ एकूण मतदार आहेत. राजापूर मतदारसंघात २ लाख ३८ हजार ४०९ एकूण मतदार आहे. यात १ लाख १३ हजार ८३९ पुरुष, तर १ लाख २४ हजार ५७० महिला मतदार आहेत. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ९१ हजार २२१ मतदार आहेत. यामध्ये १ लाख ४१ हजार ४८ पुरुष, तर १ लाख ४९ हजार १६२ महिला मतदार आहेत, तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ११ तृतीयपंथी मतदार आहेत. जिल्ह्यात ७ हजार २०१ दिव्यांग मतदारांची नोंद आहे. सर्वाधिक दिव्यांग उमेदवारांची नोंद चिपळूणमध्ये आहे.

शंभरी पार केलेले ३९४ मतदार
जिल्ह्यात २४ हजार ५८९ नवमतदार असून, ते प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे नवतरुणांमध्ये उद्या होणाऱ्या‍ मतदानाबाबत उत्साह दिसत आहे. जिल्ह्यात शंभर वयावरील ३९४ मतदारांची नोंद प्रशासनाने केली आहे. यातही ११० वर्षापेक्षा अधिक वयाच्या एका महिला मतदाराची नोंद करण्यात आलेली आहे.

४७ हजारांहून अधिक महिला मतदार
जिल्ह्यात १३ लाख ३९ हजार ६९७ एकूण मतदार आहेत. यात पुरुष मतदार ६ लाख ४६ हजार १७६ आहेत, तर ६ लाख ९३ हजार ५१० इतक्या महिला मतदार आहेत. पाच विधानसभा मतदारसंघात मिळून ४७ हजारांहून जास्त महिला मतदार आहेत. प्रत्येक मतदारसंघात आठ ते अकरा हजार इतक्या महिला अधिक आहेत. त्यामुळे पाचही ठिकाणी महिला उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहेत.

जिल्ह्यातील पाचही
मतदारसंघांतील केंद्रे
दापोली ३९२
गुहागर ३२२
चिपळूण ३३६
रत्नागिरी ३५२
राजापूर ३४५
--------
एकूण १७४७

----------

पा. नं. १ वर
अशा असतील प्रमुख लढती
दापोली ः महायुतीचे योगेश कदम विरुद्ध महाविकास आघाडीचे संजय कदम
चिपळूण ः महायुतीचे शेखर निकम विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रशांत यादव
गुहागर ः महाविकास आघाडीचे भास्कर जाधव विरुद्ध महायुतीचे राजेश बेंडल
रत्नागिरी ः महायुतीचे उदय सामंत विरुद्ध महाविकास आघाडीचे बाळ माने
राजापूर ः महाविकास आघाडीचे राजन साळवी विरुद्ध महायुतीचे किरण सामंत


- उमेदवारांची यादी

मतदारसंघ उमेदवार
* दापोली ९
* गुहागर ७
* चिपळूण ६
* रत्नागिरी ८
* राजापूर ८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

Latest Marathi News Live Update : एलपीजी (LPG) गॅसच्या तुटवड्याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SEBI on Stock Market: अस्थिर जागतिक स्थितीमुळे घाबरु नका, शांत रहा, सेबी प्रमुखांचा गुंतवणूकदारांना सल्ला

Sahyadri Tiger: ‘सह्याद्री’तील वाघांवर कॅमेरे, ड्रोनद्वारे नजर; वन विभागाकडून दर अर्ध्या तासाला अपडेट, कर्मचाऱ्यांची आठ पथके तैनात!

SCROLL FOR NEXT