कोकण

सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीसाठी आज मतदान

CD

२६३४४

२६३४५

सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीसाठी आज मतदान
सिंधुदुर्गात यंत्रणा सज्ज ः ९२१ केंद्रांवर होणार प्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १९ ः जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उद्या (ता.२०) मतदान होणार आहे. तिन्ही मतदारसंघांत मिळून ६ लाख ७८ हजार ९२८ मतदार एकूण १७ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद करणार आहेत. जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा आज सज्ज झाली. यासाठी निवडणूक कर्मचारी इलेक्ट्रॉनिक मतपेटी घेऊन आपापल्या मतदान केंद्रांवर रवाना झाले. यासाठी ५ हजार ९०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध ठाकरे शिवसेना, कुडाळमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना आणि सावंतवाडीमध्ये शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना विरुद्ध दोन अपक्ष अशी प्रमुख तुल्यबळ लढत होत आहे. या सर्वांचे राजकीय भवितव्य मतदार निश्चित करणार आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी एकूण १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण ८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये चंदक्रात जाधव (बहुजन समाज पार्टी), नीतेश राणे (भाजप), संदेश पारकर (ठाकरे शिवसेना), गणेश माने (अपक्ष), बंदेनवाझ खानी (अपक्ष), संदेश परकर (अपक्ष). कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण ७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी २ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यात रवींद्र कसालकर (बहुजन समाज पार्टी), वैभव नाईक (ठाकरे शिवसेना), नीलेश राणे (शिवसेना), अनंतराज पाटकर (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), उज्ज्वला येळावीकर (अपक्ष). सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने एकूण ६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये दीपक केसरकर (शिवसेना), राजन तेली (ठाकरे शिवसेना), अर्चना घारे (अपक्ष), दत्ताराम गांवकर (अपक्ष), सुनील ऊर्फ यशवंत पेडणेकर (अपक्ष), विशाल परब (अपक्ष) अशाप्रकारे मतदारसंघनिहाय उमेदवार रिंगणात आहेत.
या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत एकूण ६ लाख ७८ हजार ९२८ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ३ लाख ३६ हजार ९९१, स्त्री मतदार ३ लाख ४१ हजार ९३४ तर ३ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. यातील कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ३१ हजार ७४० मतदार असून, त्यात पुरुष १ लाख १४ हजार ३७९, स्त्री १ लाख १७ हजार ३५९ तर २ तृतीयपंथी असा समावेश आहे.
कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख १७ हजार १८६ मतदार असून, पुरुष १ लाख ७ हजार ९६४, स्त्री १ लाख ९ हजार २२१ तर एक तृतीयपंथी असे मतदार आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण २ लाख ३० हजार २ मतदार असून, पुरुष १ लाख १४ हजार ६४८ तर स्त्री १ लाख १५ हजार ३५४ असा मतदारांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ९२१ मतदान केंद्रांसाठी ५ हजार ९०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये पोलिस, होमगार्ड, मतदान अधिकारी व सहायक, झोनल अधिकारी, मायक्रो ऑब्जरवर यांचा यात समावेश आहे. कणकवली मतदारसंघात ३३२ मतदान केंद्रे असून, यासाठी २३०० अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कुडाळ मतदारसंघात २७९ मतदान केंद्रांसाठी १८०० कर्मचारी, सावंतवाडी मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे असून, १८०० कर्मचारी नियुक्त केले आहेत. हे कर्मचारी आज प्रांताधिकारी कार्यालय येथून मतपेटी व अन्य निवडणूक साहित्य घेऊन निवडणूक विभागाने उपलब्ध केलेल्या बसेसने मतदान केंद्रांवर रवाना झाले. तसेच झोनल अधिकारी, मायक्रो ऑब्जरवर हेसुध्दा त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाहनांनी देण्यात आलेल्या कार्यक्षेत्रात रवाना झाले.
............
चौकट
जिल्ह्यात १२ हजार
नवमतदारांचा समावेश
जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील एकूण १२ हजार ३१६ नवमतदार आहेत. यामध्ये पुरुष ६ हजार ८३०, स्त्री ५ हजार ४८५ तर एक तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. यात कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण ४ हजार ३३१ मतदार असून, पुरुष २ हजार ४२७, स्त्री १ हजार ९०३ तर एका तृतीयपंथी मतदाराचा समावेश आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात एकूण ४ हजार ३०३ मतदार असून, पुरुष २ हजार ४११ तर स्त्री १ हजार ८९२ मतदारांचा समावेश आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात एकूण ३ हजार ६८२ मतदार असून पुरुष १ हजार ९९२, स्त्री १ हजार ६९० एवढे मतदार आहेत.


पोलिसांकडून
कडक बंदोबस्त
जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी ७२ पोलिस अधिकारी, १४५४ पोलिस कर्मचारी, ८५७ होमगार्ड तसेच सुरक्षा दलाची पाच पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत. एका मतदान केंद्रात किमान एक पोलिस आणि एक होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे. दोन मतदान केंद्रे एकाच ठिकाणी असल्यास दोन पोलिस आणि एक होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली.

कोट
जिल्ह्यातील मृत, स्थलांतरित तसेच दुबार मतदारांची नावे वगळली आहेत. त्यामुळे मतदार यादी अद्ययावत झाली आहेत. तसेच ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृहमतदानाची संधी दिली आहे. मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही अधिक मजबूत करावी. जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी प्रशासनाने विविध उपक्रम घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाचे मत लोकशाही मजबूत करणारे आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी मतदान करावे.
- अनिल पाटील, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील स्थिती
* एकूण मतदार - ६,७८,९२८
* एकूण उमेदवार - १७
* एकूण मतदान केंद्र - ९२१
* एकूण तैनात कर्मचारी, अधिकारी - ५९००

कणकवली मतदारसंघ
* एकूण मतदार - २,३१,७४०
* रिंगणातील उमेदवार - ६
* मतदान केंद्र - ३३२
* निवडणूक कर्मचारी संख्या - २३००

कुडाळ मतदारसंघ
* एकूण मतदार - २,१७,१८६
* रिंगणातील उमेदवार - ५
* मतदान केंद्र - २७९
* निवडणूक कर्मचारी संख्या - १८००

सावंतवाडी मतदारसंघ
* एकूण मतदार - २,३०,००२
* रिंगणातील उमेदवार - ६
* मतदान केंद्र - ३१०
* निवडणूक कर्मचारी संख्या - १८००
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Flight Emergency: न्यूयॉर्कहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान हवेतच बंद, सहा तास आकाशात राहिल्यानंतर ... मोठी दुर्घटना टळली!

Sambhajinagar PM Awas Yojana: ९४ कुटुंबांच्या घराचे स्वप्न साकार; फुलंब्रीत आवास योजनेची मंजुरी पत्रे वाटप; कच्च्या घरातून पक्क्या घराकडे वाटचाल; फुलंब्रीत लाभार्थ्यांना दिलासा

Paithan Toilet Vandalism: ७० लाखांची स्वच्छतागृहे बंदच; पैठणमध्ये तोडफोडीने नागरिक संतप्त; उद्‍घाटनाआधीच स्वच्छतागृहांची मोडतोड

Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

राज्यसभा निवडणुकीत विरोधकांची गेम, भाजपने पुरेसं संख्याबळ नसतानाही २ जागा जिंकल्या; काँग्रेसला आमदारांचा दगा, काय घडलं?

SCROLL FOR NEXT